Australian Open 2024 : रोहन बोपान्ना, मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत 

४३ वर्षांच्या रोहन बोपान्नाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. 

140
Australian Open 2024 : रोहन बोपान्ना, मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत 
Australian Open 2024 : रोहन बोपान्ना, मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा टेनिस स्टार रोहन बोपान्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडन यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत दुसरं मानांकन मिळालं आहे. आणि या जोडीने आतापर्यंत स्पर्धेत चांगला खेळ करत तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात दोघांनी जॉन मिलमन आणि एडविन विंटर या यजमान देशाच्या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव केला. (Australian Open 2024)

सामना बोपान्ना, एबडन जोडीसाठी अजिबात कठीण गेला नाही. या अनुभवी जोडीचं पहिली सर्व्हिस यशस्वी होण्याचं प्रमाण ८० टक्के होतं. खासकरून रोहनची एक सर्व्हिस २०३ किमी प्रतीतास वेगाने आली. तेव्हा उपस्थितांनीही टाळ्या वाजवल्या. दोघांनी मिळून सामन्यांत १७ विनर शॉट मारले. (Australian Open 2024)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या नावाखाली मिठाई विकल्याबद्दल ॲमेझॉनला नोटीस)

या स्पर्धेत पहिल्या फेरीत बोपान्ना, एबडन यांनी ऑस्ट्रेलियन जोडी जेम्स डकवर्थ आणि मार्क पोलमन्स या जोडीचा ७-६, ६-४ आणि ७-६ असा पराभव केला होता. बोपान्नाचा दुहेरी व्यावसायिक टेनिसमधील हा ५०० वा विजय ठरला होता. आता चौथ्या फेरीत या जोडीचा मुकाबला वेस्ली कूलऑफ आणि निकोला मेक्टिक यांच्याशी होणार आहे. (Australian Open 2024)

बोपान्ना खेरीत श्रीराम बालाजी या आणखी एका भारतीय टेनिसपटूने पुरुषांच्या दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. बालाजी व्हिक्टर कॉर्निया या रोमानियन खेळाडूसोबत खेळत आहे. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.