Ayodhya Ram Mandir: ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या नावाखाली मिठाई विकल्याबद्दल ॲमेझॉनला नोटीस

'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' च्या नावाने दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह मिठाई विकल्याबद्दल ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला नोटीस बजावली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) तक्रारीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे

166
Ayodhya Ram Mandir: 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' च्या नावाखाली मिठाई विकल्याबद्दल ॲमेझॉनला नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई www.amazon.in वर ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या नावाने दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह मिठाई विकल्याबद्दल ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला नोटीस बजावली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) तक्रारीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे (Ayodhya Ram Mandir)

२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक होणार आहे. ग्राहक प्राधिकरणाने अॅमेझॉनकडून सात दिवसांच्या आत प्रतिसाद मागितला आहे आणि असा इशारा दिला आहे की प्रतिसाद न दिल्यास ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ च्या तरतुदींनुसार कंपनीविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल. दरम्यान, ई-कॉमर्स कंपनीने सांगितले की ते या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करत आहेत.

(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : राज्यात ७५ लाखाहून आधिक घरात पोहोचल्या अक्षता; गर्भगृहात पूजाविधीसाठी ११ जोडप्यांची निवड)

खोटी माहिती देणारी अन्नपदार्थांची ऑनलाइन विक्री केल्याने उत्पादनाच्या वास्तविक वैशिष्ट्यांबद्दल ग्राहक गोंधळून जातात. अशा प्रकारची प्रथा ग्राहकांवर खरेदीचे निर्णय घेण्यास अन्यायकारकपणे प्रभावित करते. त्याऐवजी, जर उत्पादनाची अचूक वैशिष्ट्ये नमूद केली गेली असती, तर ग्राहकांनी कदाचित उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतला नसता.सीसीपीएने नोटीस जारी केल्यापासून सात दिवसांच्या आत अॅमेझॉनचे उत्तर मागितले आहे, आवश्यक कारवाई सुरू केली जाणार असल्याचे म्हणले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.