Ayodhya Ram Mandir : राज्यात ७५ लाखाहून आधिक घरात पोहोचल्या अक्षता; गर्भगृहात पूजाविधीसाठी ११ जोडप्यांची निवड

राज्यातील १२ कोटी लोकसंख्येपैकी किमान ३.५ कोटी जनतेच्या घरी निमंत्रण पोहोचल्याचा असल्याचे बोलले जात आहे.

158
Ayodhya Ram Mandir : राज्यात ७५ लाखाहून आधिक घरात पोहोचल्या अक्षता; गर्भगृहात पूजाविधीसाठी ११ जोडप्यांची निवड

अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता महाराष्ट्राच्या ७५ लाखांहून जास्त घरात पोचल्या आहेत. राज्यातील १२ कोटी लोकसंख्येपैकी किमान ३.५ कोटी जनतेच्या घरी निमंत्रण पोहोचल्याचा अंदाज असल्याचे बोलले जात आहे. (Ayodhya Ram Mandir )

अक्षता घरोघरी पोहोचविण्यासाठी केवळ १ ते १५ जानेवारी असा कालावधी मिळाला होता.देशातील या सर्वात महत्वाच्या सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या अतिथींमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ५०० जण असून देशातील सर्वाधिक म्हणजे ३५० निमंत्रणे मुंबईत दिली गेली असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Ayodhya Ram Mandir )

महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचा समावेश 
गर्भगृहात पूजाविधीसाठी जी ११ जोडपी निवडली आहेत त्यात महाराष्ट्रातील दोघे आहेत. मुंबई प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे जे वास्तव्यास खारघर येथे आहेत आणि तुळजापूरचे गायकवाड असे दोघे पत्नीसह प्रतिष्ठापनेवेळी उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : पुणेकरांनो, जगातील सर्वात मोठ्या दीपोत्सवात सहभागी व्हा)

राज्यभर उत्साह

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारीच अयोध्येत पोहोचणार आहेत.
  • महाराष्ट्रात दोन हजार मंदिरात उत्सव
  • जवळपास ७० हजार मंदिरांमध्ये पूजा होणार
  • एलईडी स्क्रीनवर हा सोहळा दाखवला जाणार.
  • अनेक परिसरात मिरवणूका तसेच निघणार आहेत.
  • अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.