Kantilal Bhuria: “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना…” कांतीलाल भूरिया यांच्या वक्तव्याने मोठा वाद

123
Kantilal Bhuria: “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना...
Kantilal Bhuria: “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना..." कांतीलाल भूरिया यांच्या वक्तव्याने मोठा वाद

मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) उमेदवार कांतीलाल भूरिया (Kantilal Bhuria) यांनी गुरुवारी (९ मे) एका प्रचारसभेत केलेल्या घोषणेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या विधानावरुन भाजपा काँग्रेसवर टीका करत आहे. भाजपाने कांतीलाल भूरिया (Kantilal Bhuria) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

(हेही वाचा –काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangekar यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार)

भूरिया (Kantilal Bhuria) म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने न्याय पत्रात (निवडणुकीचा जाहीरनामा) महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. याअंतर्गत आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातील महिलांना आम्ही दर वर्षी १ लाख रुपये देणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या दोन बायका (पत्नी) असतील त्यांना २ लाख रुपये मिळतील.” कांतीलाल भूरिया (Kantilal Bhuria) यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. (Kantilal Bhuria)

काँग्रेसकडुन पाठराखण

भूरिया (Kantilal Bhuria) यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा मंचावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील भूरिया यांच्या घोषणेचं समर्थन केलं. पटवारी म्हणाले, “भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे.” (Kantilal Bhuria)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.