काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangekar यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

105
काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangekar यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आपल्या प्रचार साहित्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे अधिकृत चिन्ह वापरल्याप्रकरणी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून धंगेकर यांच्यावर आयोगाने आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी अशी आग्रही मागणी गुरुवारी लेखी निवेदनाद्वारे केली. तसेच त्यांच्या या कृतीचा पक्षाने तीव्र शब्दात निषेधही केला. (Ravindra Dhangekar)

यासंदर्भात आजच तातडीने एक प्रेस नोट काढत स्पष्ट केले आहे की, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांच्या प्रचार साहित्यात राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ जाणीवपूर्वक वापरल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांची ही कृती केवळ निवडणूक कायद्यांचे उल्लंघन करत नाही तर मतदारांची दिशाभूल करणारी आहे, जी फसवी आणि गुन्हेगारी कृती आहे. (Ravindra Dhangekar)

(हेही वाचा – …तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही; BJPचा काँग्रेसवर हल्लाबोल)

प्रदेश सरचिटणीस गर्जे यांनी आपल्या तक्रारीत अशीही मागणी केली आहे. पुणे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचे सर्व साहित्य त्वरित जप्त करण्यात यावे. याच संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार काँग्रेस उमेदवाराने प्रचारात आमच्या पक्षाचे चिन्ह वापरणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. भारतीय निवडणूक आयोगाने घड्याळ हे आमच्या पक्षाचे चिन्ह म्हणून अधिकृत केले आहे. त्यामुळे मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमच्या चिन्हाचा कोणताही अनधिकृत वापर हा फौजदारी गुन्हा आहे. त्यांच्या कृतींमुळे आमच्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता कमी होते. (Ravindra Dhangekar)

ब्रिजमोहन पुढे म्हणाले की, “रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि कायद्याच्या या घोर उल्लंघनाबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा” अशी विनंती आम्ही राज्य निवडणूक अधिकाऱ्याकडे औपचारिकपणे केली आहे. आमचा निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांवर विश्वास असून जिथे मतदार निर्णय घेतात आणि अचूक माहितीच्या आधारे मतदान करतात. मतदारांना खोटी माहिती देऊन फसवणूक करण्याच्या अशा कृत्यांना आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेत स्थान नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की, निवडणूक प्रक्रिया हेराफेरी आणि फसवणुकीपासून मुक्त राहण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी आणि त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Ravindra Dhangekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.