शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला निघालो: Uday Samant

131
शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला निघालो: Uday Samant
शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला निघालो: Uday Samant

एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आजही चर्चेचा विषय ठरत आहे. या बंडामुळे अनेक मोठे गौप्यस्फोट झाले. आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सुरतला गेले होते. त्यावेळी नेमके काय घडले? याबद्दल सांगितले आहे. (Uday Samant)

सूरतला जातो हे उघडपणे सांगितले

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “शिवसेनेत बंड का झाले याची अनेक कारणे आहेत. एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले होते. शिंदे यांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा का मिळाला? कारण आमदारांमध्येही नाराजी होती. त्यातूनच मीसुद्धा शिंदे यांना साथ दिली. तत्पूर्वी मी शिवसेना भवनात जाऊन नेतेमंडळींना मी सूरतला चाललो हे सांगितले होते. मी तेथे फ्रँकी खाल्ली अशी टीका झाली. हो, मी शिवसेना नेत्यांबरोबर तेथे खानपान केले. पण सूरतला जातो हे उघडपणे सांगितले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शानस आणून देणार होतो. पण ठाकरे यांची भेट काही होऊ शकली नाही.” (Uday Samant)

मला ओसाडगावची पाटीलकी नको होती

“मी ११ वर्षे शिवसेनेत होतो. सहा-सहा महिने उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नसत. मी सूरतला चाललो हे साऱ्यांना सांगून शिवसेना भवनातून बाहेर पडलो. मला कोणीही आडवले नाही. खाली उतरून मी गाडीत बसून सूरतच्या दिशेने रवाना झालो. मी शिंदे यांना साथ देऊ नये, असे माझे मन वळविण्याचे प्रयत्न झाले. शिंदे यांच्याकडील नगरविकास आणि रस्ते विकास मंडळ ही दोन खाती देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मी त्याला ठामपणे नकार दिला. कारण मला ओसाडगावची पाटीलकी नको होती.” (Uday Samant)

महायुतीच्या उमेदवारांना 40 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल

उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना 40 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा दावा केला. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेले मतदानात महायुतीच्यादृष्टीने अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ठाणे आणि मुंबईत उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला, ही बाब त्यांनी मान्य केली. ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई या मतदारसंघांमध्ये आधी उमेदवार जाहीर झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे उदय सामंत यांनी म्हटले. (Uday Samant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.