Republic Day Programme : यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला केंद्रीत असणार – संरक्षण सचिव गिरीधर अरमाने

प्रथमच १००  महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाने होणार सुरुवात

149
Republic Day Programme : यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला केंद्रीत असणार - संरक्षण सचिव गिरीधर अरमाने

‘विकसित भारत’ आणि ‘भारत – लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथ येथे होणारे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला-केंद्रित असेल, अशी माहिती संरक्षण सचिव गिरीधर अरमाने ( Defense Secretary Giridhar Armane)यांनी दिली. नवी दिल्ली शुक्रवारी (१९ जानेवारी) येथे पत्रकार परिषदेला ते बोलत होते. महिला संचलन करणाऱ्या तुकड्या या संचलनाचा प्रमुख भाग असणार आहेत. ज्यात राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये, संघटना यांचे बहुतांश चित्ररथ देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगतीची झलक प्रदर्शित करतील. ‘भारत ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची जननी आहे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या अनुषंगाने संकल्पनांची निवड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. Republic Day Programme

प्रथमच १०० महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाला सुरुवात होईल. महिला कलाकारांचे शंख , नादस्वरम, नगाडा वाजवून या संचलनाची सुरुवात केली जाईल. या संचलनात प्रथमच कर्तव्यपथावरून तिन्ही सेनादलातील सर्व महिलांचे पथक पहायला मिळणार आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.संचलनाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होईल आणि ते सुमारे ९०मिनिटे चालेल. Republic Day Programme

या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण
यावर्षी सुमारे १३ हजार विशेष पाहुण्यांना प्रजासत्ताक दिवस संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. व्हायब्रंट गावांचे सरपंच;स्वच्छ भारत अभियान, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील महिला कर्मचारी, इस्रोच्या महिला अंतराळ शास्त्रज्ञ, योग शिक्षक (आयुष्मान भारत), आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते आणि पॅरालिम्पिक पदक विजेते यांच्या सोबतीने सर्वोत्कृष्ट बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात संदर्भ आलेल्या व्यक्ती तसेच प्रकल्प वीर गाथा ३.०चे ‘सुपर-१००’ आणि राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचे विजेते देखील संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे गिरीधर अरमाने म्हणाले .

हवाई दलाचाही समावेश 

फ्रान्समधील ९५ सदस्यांचे मार्चिंग पथक आणि ३३सदस्यांचे बँड पथकही या संचलनात सहभागी होणार आहेत. फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानासह, एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होणार आहेत.

चित्ररथ – एकूण २५ चित्ररथ – १६राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच नऊ मंत्रालये किंवा विभागांचे चित्ररथ संचलनादरम्यान कर्तव्य पथावर उतरतील. यात महाराष्ट्र्राचाही समावेश आहे.

विशेष नाणी आणि टपाल तिकीटे – राष्ट्र या वर्षी आपल्या प्रजासत्ताकचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना या उत्सवादरम्यान संरक्षण मंत्रालय एक विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारे कार्यक्रम – पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार, आदिवासी पाहुणे इत्यादींची भेट घेतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.