Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच

इस्टर्न फ्री वे भाग ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये पुलाचे खांबावरील उथळ्यांना अर्थात पेडेस्टेल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अर्थात क्रॅक्स झाल्याचे आढळून आले.

581
Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच
Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेल्या पूर्व मुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वेच्या देखभालीची जबाबदारी आता महापालिकेच्या खांद्यावर सोपवण्यात आली अहे. त्यामुळे या पुलाच्या खांबावरील पेडेस्टलमध्ये क्रॅक आढळून आल्याने तसेच त्यावरील बेअरींग खराब झाल्याने संभाव्य मोठे नुकसान टाळण्याच्या दृष्टीकोनातून याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामांवर तब्बल ३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Eastern Freeway)

पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम एमएमआरडीने २०१४मध्ये पूर्ण केले. या इस्टर्न फ्री वेच्या कामांसाठी एमएमआरडीएने बांधलेल्या सिम्प्लेक्स इन्फास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड केली केली. या कंपनीने काम पूर्ण करून दिल्यानंतर मे २०१५मध्ये पूर्व मुक्त मार्ग एमएमआरडीएने जिथे आहे जसा आहे या तत्वावर महापालिकेला दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकरता हस्तांतरीत केला होता. (Eastern Freeway)

(हेही वाचा – Increase In Toll Charges: वांद्रे-वरळी सी लिंक टोल शुल्क १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढणार)

इस्टर्न फ्री वे भाग ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये पुलाचे खांबावरील उथळ्यांना अर्थात पेडेस्टेल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अर्थात क्रॅक्स झाल्याचे आढळून आले. त्यामुळे खांबावरील पेडेस्टेल वरील बेअरींगही खराब असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे उथळे व बेअरींगमुळे पुलाचे इतर भाग पिअर कॅप, पीएसपी सेगमेंटल बॉक्स गर्डर यांच्यावरील बांधकामाच्या ताणात वाढ होऊ मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दिसून आली. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमण्यात आला आहे. (Eastern Freeway)

या पुलाच्या बांधकामासाठी मॉरर सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराने उणे २५ टक्के दराने बोली लावत विविध करांसह ३८.३१ कोटी रुपयांमध्ये हे मिळवले आहे. पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये या इस्टर्न फ्रि वेची दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. (Eastern Freeway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.