Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?

Lok Sabha Election 2024 : माढा, बीड, रावेर, सातारा आणि वर्धा या मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या पक्षात परतले आहेत. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

147
Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?
Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची (Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजूनही आपली यादी जाहीर केलेली नाही. अशातच मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच शनिवार ३० मार्च रोजी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे.

(हेही वाचा – कल्याणमध्ये शिंदे विरुद्ध दिघे? Shivsena UBT ची उमेदवारी दिघे कुटुंबाकडे?)

चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी :

असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे. यातील ठाकरे गटाने १७ जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसनेही १० जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकताही आता संपणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच)

अमोल कोल्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित :

शरद पवार (Lok Sabha Election 2024) यांच्या गटाला जागावाटपामध्ये बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा हे मतदारसंघ मिळाले आहे. यातील बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, अन्य उमेदवार कोण असणार याची यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे.

पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर होणार :

शरद पवार (Lok Sabha Election 2024) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरूरमधून अमोल कोल्हे (Amol Kolhe), नगरमधून नीलेश लंके (Nilesh Lanke), दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाल्या मामा उर्फ ​​सुरेश म्हात्रे हे संभाव्य उमेदवार आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा – Shinde Group : मुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती; तरीही शिंदे गटाची प्रचाराची ठरली रणनीती)

निलेश लंके यांच्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का :

माढा, बीड, रावेर, सातारा आणि वर्धा या मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या पक्षात परतले आहेत. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.