Shinde Group : मुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती; तरीही शिंदे गटाची प्रचाराची ठरली रणनीती

108

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेचा महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र मुख्यमंत्री हे उपस्थितीत नसल्याने त्यांची कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली. मात्र ही भेट राज्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात होती. त्यावरच चर्चा झाली अशी माहिती शिवसेनेच्या (Shinde Group) वतीने देण्यात आली.शुक्रवारी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली.

(हेही वाचा Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात आंदोलन, सुटी असूनही कार्यकर्त्यांची मात्र पाठ)

मुख्यमंत्री शिंदे त्यावेळी हजर नव्हते, त्यामुळे तब्बल तीन तास सर्वच मंत्री, आमदार, खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तात्काळत बसावं लागलं. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हेही उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर बोलतांना म्हस्के म्हणाले की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिथे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होती. त्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ज्या जागा शिवसेनेच्या (Shinde Group) हक्काच्या आहेत. त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर महायुतीतील वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तर नाशिक लोकसभेची जागा पारंपरिक शिवसेनेची आहे. त्यामुळे ती आमच्याच वाट्याला येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.