Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंचा एकेरी भाषेत नारायण राणेंवर हल्लाबोल

159
Lok Sabha Election 2024: एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल

“आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे. त्या म्हणी मी केल्या नाहीत किंवा तुम्ही केल्या नाहीत. पण एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे, तुला लाज वाटली पाहिजे. २-३ वेळेस तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात तिकडे उभा राहिला तिकडे साफ करून टाकला. लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो”, अशा एकेरी भाषेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane)यांच्यावर हल्ला केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची कोकणात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर कडाडून टीका केली.

(हेही वाचा – North Central Mumbai Constituency : उत्तर मध्य मुंबईतून भाजपाच्या पराग अळवणींनीही भरला अर्ज)

शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ४ दिवसांपूर्वी येऊन गेलो होतो. म्हटलं आता काय बोलायचं, पण आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे नेते पचकून गेले. बेअकली जनता पार्टी आहे. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? आजपर्यंत त्यांना मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो. काही लाज वाटत नाही. कमळाबाई म्हणत होतो आणि आता बेअकली म्हणतो, अशी टीकाही त्यांनी राणेंवर केली.

जनतेच्या प्रश्नावर बोला
पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंडी काही बाहेर येत नाहीयेत, त्यावर बोला. तुमच्यापेक्षा कोंबडं बरं. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट म्हणा नाही तर तुमची जिभ सरळ करता येते. मी राम मंदिरात जाऊन आलो. तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाहीत? असा सवालही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.