North Central Mumbai Constituency : उत्तर मध्य मुंबईतून भाजपाच्या पराग अळवणींनीही भरला अर्ज

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली.

148
North Central Mumbai Lok Sabha 2024 : वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद

उत्तर मध्य मुंबईतून महायुतीच्यावतीने भाजपाने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरला. मात्र, या मतदार संघातून भाजपाच्याकडून भाजपाचे आमदार पराग अळवणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपाचे मुख्य उमेदवार हे उज्ज्वल निकम असून जर त्यांचा अर्ज बाद ठरल्यास सुरक्षेचा उपाय म्हणून अळवणी यांनी आपला डमी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती मिळत आहे. (North Central Mumbai Constituency)

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार शुक्रवारी निकम यांनी भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड या निवडणूक रिंगणात असून गायकवाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (North Central Mumbai Constituency)

(हेही वाचा – Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024 : कोकणी माणूस कोणाक करतलो आपलोसो)

या मतदार संघातून भाजपाच्यावतीने आमदार पराग अळवणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उज्ज्वल निकम आणि पराग अळवणी या दोघांनी भाजपाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. अळवणी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रकात आयकराच्या नोंदीनुसार ५७ लाख ९३ हजार ०५० उत्पन्न दाखवले. सन २०१८-१९ मध्ये ३३ लाख एवढे यांचे उत्पन्न होते, त्यात वाढ होऊन अळवणी यांचे उत्पन्न् ५७ लाख ९३ हजारांवर पोहोचले आहे. तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न २ लाख ४३ हजार रुपयांचे दाखवले आहे. सन २०१८-१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ८४ हजार रुपये एवढे होते. या मतदार संघातून याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सतीश बेलामकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. (North Central Mumbai Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.