Kurla Bhabha Hospital : रुग्णाच्या नातेवाईकांकडून नर्सना शिवीगाळ, आता नेमणार अतिरिक्त सुरक्षा रक्षक

अतिरिक्त सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रूग्णालय प्रशासनामार्फत पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला आहे.

182
Kurla Bhabha Hospital : रुग्णाच्या नातेवाईकांकडून नर्सना शिवीगाळ, आता नेमणार अतिरिक्त सुरक्षा रक्षक

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला येथील खान बहादूर भाभा रूग्णालयात रूग्ण आणि कर्मचारी यांच्यातील वादाच्या प्रसंगानंतर कर्मचारी वर्गाने २ मे २०२४ रोजी काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. या घटनेनंतर रूग्णाने पोलिस ठाण्यात कर्मचारी वर्गाची माफी मागितल्याने हा वाद संपुष्टात आला. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी वर्गही पुन्हा कामावर रूजू झाला. दरम्यान, या घटनेनंतर कुर्ला भाभा रुग्णालय (Kurla Bhabha Hospital) प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेची दखल घेऊन महानगरपालिकेचे उप प्रमुख सुरक्षा अधिकारी परिमंडळ-५ यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त सुरक्षा रक्षक देण्याचे निर्देश दिले आहेत. (Kurla Bhabha Hospital)

रूग्णाच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास नकार

कुर्ला येथील खान बहादूर भाभा रूग्णालयात एका महिला रूग्णाला (वय-१७) ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता तात्काळ वैद्यकीय विभागात (EMS) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १ मे २०२४ रोजी दुपारी या रूग्णाला या रूग्णालयातील चौथ्या मजल्यावरील महिला रूग्ण कक्षात स्थलांतरित करण्यात आले होते. रात्री ११.०० वाजता दाखल रूग्णांना औषधे व इंजेक्शन देण्याची वेळ होती. तसेच कक्षामध्ये स्वच्छतेची कामे सुरू असल्याने परिचारिका यांनी कक्षामध्ये असलेल्या‍ रूग्णांच्याच नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी रूग्ण महिलेजवळ जाऊन तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनाही बाहेर जाण्यास सांगितले. परंतु रूग्णाच्या नातेवाईकांनी बाहेर जाण्यास नकार देत ते तिथेच बसून राहिले. त्यातून वाद होवून रूग्णाने दोन्ही परिचारिकांना यावेळी शिवीगाळ केली. (Kurla Bhabha Hospital)

कुर्ला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल

त्यानंतर रूग्णाची रूग्णालयातील घरी जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रूग्ण बाहेर गेला. मात्र थोड्या वेळाने म्हणजे रात्री ११.३० वाजता अजुन काही नातेवाईकांना घेऊन रूग्ण महिला पुन्हा त्याठिकाणी आले. रूग्णाने पुन्हा परिचारिकांसोबत वाद घातला. कर्तव्यावर उपस्थित परिचारिकांना अश्लाघ्य शिवीगाळ करून त्यांच्या कानशिलात मारले. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिका यांनी मिळून कुर्ला पोलिस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल केला. (Kurla Bhabha Hospital)

वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनासमोर कामबंद आंदोलन

या घटनेनंतर सर्व कर्मचारी वृंदांने वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनासमोर कामबंद आंदोलन पुकारले. कर्मचारी वर्गाने संबंधित रूग्णाला अटक केल्याशिवाय कर्तव्यावर रूजू होणार नाही, असा निर्धार केला होता. कर्मचारी वर्गाचे एकीकडे आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे रूग्णालयात कंत्राटी तत्वावर असलेले परिचारिका व डॉक्टर्स यांच्या सहाय्याने रूग्णसेवा अविरत सुरू होती. (Kurla Bhabha Hospital)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी भरले उमेदवारी अर्ज)

रूग्णाच्या नातेवाईकांनी मागितली माफी

वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या दालनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनाही तातडीने बोलविले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी कर्मचाऱ्यांशी व कर्मचारी संघटना प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करून स्पष्ट केले की, हा रुग्ण ही किशोरवयीन व महिला असल्यामुळे तसेच रात्रीच्या वेळी अटक करता येत नाही. परंतु, या घटनेबाबत योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. या आश्वासनाने कर्मचाऱ्यांचे व कर्मचारी संघटना प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. कुर्ला पोलिस ठाण्यात रूग्णाच्या नातेवाईकांना बोलवून युनियन प्रतिनिधी व वैद्यकीय अधीक्षक, अधिसेविका व संबंधित कर्मचारी यांच्या समक्ष माफी मागितली. त्यानंतर सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. (Kurla Bhabha Hospital)

वेळांव्यतिरिक्त कोणत्याही नातेवाईकांना वॉर्डात थांबता येणार नाही

या घटनेची दखल घेऊन महानगरपालिकेचे उप प्रमुख सुरक्षा अधिकारी परिमंडळ-५ यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त सुरक्षा रक्षक देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रूग्णालय प्रशासनामार्फत पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला आहे. तसेच नातेवाईकांसाठी असलेली प्रवेशिका पद्धत परिणामकारकपणे वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक हे कक्षामध्ये थांबण्यासाठीच्या वेळांवर नियंत्रण आणणे शक्य होईल. तसेच या वेळांव्यतिरिक्त कोणताही नातेवाईक कक्षामध्ये थांबणार नाही. सुरक्षा रक्षकांकडूनच प्रवेशिकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्ण आणि कर्मचारी यामधील वादाचे प्रसंग टाळणेही शक्य होईल. रूग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढण्यासोबतच कर्मचारी वर्गाचेही समुपदेशन करण्यात येईल, असे रूग्णालय प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. (Kurla Bhabha Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.