PUNE: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

न दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते.

111
PUNE: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी ‘मोगरा महोत्सवा’च्या निमित्ताने पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मोगऱ्याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रूप अधिकच मनोहारी दिसत होते. (PUNE)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – BCG Vaccine: १८ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार बीसीजी लस, २९ एप्रिलपासून सर्वेक्षण सुरू)

गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट
दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३५०० किलो गुलछडी, ८०० किलो झेंडू, १२० किलो कन्हेर फुले, १ लाख गुलाब, ७० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यासह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.