Increase In Toll Charges: वांद्रे-वरळी सी लिंक टोल शुल्क १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढणार

वांद्रे-वरळी सी लिंकवरून असंख्य वाहनचालक ये-जा करतात.

98
Increase In Toll Charges: वांद्रे-वरळी सी लिंक टोल शुल्क १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढणार

वांद्रे-वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना येत्या १ एप्रिलपासून टोलसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. (Increase In Toll Charges)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल शुल्कात १८ टक्क्यांनी वाढ जाहीर झाली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून असंख्य वाहनचालक ये-जा करतात. ८ पदरी ओव्हर पासचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना आता कार आणि जीपसाठी ८५ रुपये, मिनीबस, टेम्पो आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १३० रुपये, तर दुचाकी ट्रक आणि बससाठी १७५ रुपये मोजावे लागत आहेत, मात्र या दरात १ एप्रिल २०२४पासून बदल होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पवार काका-पुतणे उमेदवारांची यादी जाहीर करत नाहीत )

एमएसआडीसीच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 
* कार आणि जीपच्या एकेरी प्रवासासाठी नवीन टोल दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून १०० रुपये असतील.
* मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी १६० रुपये मोजावे लागतील.
*एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांना ५० आणि १०० टोल कूपन बुक खरेदी केल्यास अनुक्रमे १० टक्के आणि २० टक्के सवलत मिळणार आहे.
* वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान १०.०५ किमी लांबीच्या कोस्टल रोड सध्या टोल फ्री आहे. सी लिंकच्या दोन्ही टोकांवरील कोस्टला रोडला जोडल्यानंतर कोस्टल रोडवरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. (Increase In Toll Charges)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.