Om Jai Jagdish Hare Aarti : ॐ जय जगदीश हरे संपूर्ण आरती अर्थासहित जाणून घ्या इथे!

विष्णू हे ब्रह्मांडाचे पालनकर्ता आहेत. शिवशंकराप्रमाणे ते लवकर प्रसन्न होत नसले तरी प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या आयुष्यात सुख-समृद्धीचा वर्षाव करतात.

100
Om Jai Jagdish Hare Aarti : ॐ जय जगदीश हरे संपूर्ण आरती अर्थासहित जाणून घ्या इथे!

हिंदीमधली “ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे” ही आरती मराठी भाविकांमध्येही प्रसिद्ध आहे. या आरतीमध्ये भगवान विष्णूंचा उल्लेख जगदीश्वर असा केला आहे, म्हणजे जगाचा ईश्वर. (Om Jai Jagdish Hare Aarti)

विष्णू हे ब्रह्मांडाचे पालनकर्ता आहेत. शिवशंकराप्रमाणे ते लवकर प्रसन्न होत नसले तरी प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या आयुष्यात सुख-समृद्धीचा वर्षाव करतात. ही आरती हिंदी असली तरी मराठी भाविक नेहमी ही आरती म्हणतात व भगवान विष्णूची कृपा मिळवतात. (Om Jai Jagdish Hare Aarti)

(हेही वाचा – Marathi Ukhane : लग्न-समारंभात मराठी उखाणे घ्यायला अडचण होते? मग आमचे ’हे’ उखाणे पाठ करुन ठेवा!)

चला तर जाणून घेऊया या आरतीचा काय आहे अर्थ :

ॐ जय जगदीश हरे,
स्वामी जय जगदीश हरे ।
भक्त जनों के संकट,
दास जनों के संकट,
क्षण में दूर करे ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥

हे विष्णू भगवान, तुम्ही साक्षात जगदीश म्हणजे जगाचे ईश्वर आहात, तुम्ही जगाचे स्वामी आहात. तुम्ही भक्तांचे, दासांचे संकट क्षणात दूर करता. (Om Jai Jagdish Hare Aarti)

जो ध्यावे फल पावे,
दुःख बिनसे मन का,
स्वामी दुःख बिनसे मन का ।
सुख सम्पति घर आवे,
सुख सम्पति घर आवे,
कष्ट मिटे तन का ॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

जो मनापासून एकाग्र होऊन तुमचे ध्यान करतो, त्याला सर्व दुःखांचा विसर पडतो. त्याच्या घरी नेहमीच सुख संपत्तीचा वर्षाव होत असतो आणि त्याच्या सर्व अडचणी नाहिशा होतात. (Om Jai Jagdish Hare Aarti)

और जानें
मात पिता तुम मेरे,
शरण गहूं किसकी,
स्वामी शरण गहूं मैं किसकी ।
तुम बिन और न दूजा,
तुम बिन और न दूजा,
आस करूं मैं जिसकी ॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

स्वामी विष्णू तुम्हीच माझे आई-वडील आहात. मी इतर कोणाच्या चरणापाशी का जाऊ? तुमच्याशिवाय माझं कोण आहे या जगात? तुमच्याशिवाय मला दुसरं काही मिळवायचं नाही. तुम्हीच माझे सर्वकाही आहात. (Om Jai Jagdish Hare Aarti)

तुम पूरण परमात्मा,
तुम अन्तर्यामी,
स्वामी तुम अन्तर्यामी ।
पारब्रह्म परमेश्वर,
पारब्रह्म परमेश्वर,
तुम सब के स्वामी ॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

भगवान विष्णू, तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हाला लोकांच्या मनातलं कळतं, जे कोणाला दिसत नाही ते तुम्हाला दिसतं. तुम्ही परब्रह्म, तुम्ही परमेश्वर आहात. तुम्ही सगळ्यांचे स्वामी आहात. (Om Jai Jagdish Hare Aarti)

तुम करुणा के सागर,
तुम पालनकर्ता,
स्वामी तुम पालनकर्ता ।
मैं मूरख फलकामी,
मैं सेवक तुम स्वामी,
कृपा करो भर्ता॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

तुमच्या मनात करुणा आहे, तुम्हाला भक्तांची काळजी आहे. तुम्ही आमचे पालपोषण करता. पण मी मात्र नेहमी फळांसाठी तुमची उपासना करतो, म्हणून मी मूर्ख आहे. खरंतर मी सेवक आणि तुम्ही स्वामी आहात. तुम्हीच आमच्यावर कृपा करु शकता. (Om Jai Jagdish Hare Aarti)

तुम हो एक अगोचर,
सबके प्राणपति,
स्वामी सबके प्राणपति ।
किस विधि मिलूं दयामय,
किस विधि मिलूं दयामय,
तुमको मैं कुमति ॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

तुम्ही अगोचर आहात म्हणजेच तुम्हाला मी जाणून घेऊ शकत नाही. तुम्हीच सर्वांना प्राण पुरवता. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात, आपली भेट कधी होईल, मी आसुसलो आहे प्रभू तुम्हाला भेटायला. (Om Jai Jagdish Hare Aarti)

दीन-बन्धु दुःख-हर्ता,
ठाकुर तुम मेरे,
स्वामी रक्षक तुम मेरे ।
अपने हाथ उठाओ,
अपने शरण लगाओ,
द्वार पड़ा तेरे ॥
॥ ॐ जय जगदीश हरे..॥

तुम्ही गरीबांचे बंधू आहात, दुःखांना दूर नेणारे आहात. तुम्ही स्वामी आणि रक्षकही तुम्हीच आहात. तुमचा हात उचलून आम्हाला जवळ घ्या. मी तुमच्या द्वारापाशी येऊन तुमची विनवणी करी आहे. (Om Jai Jagdish Hare Aarti)

विषय-विकार मिटाओ,
पाप हरो देवा,
स्वमी पाप(कष्ट) हरो देवा ।
श्रद्धा भक्ति बढ़ाओ,
श्रद्धा भक्ति बढ़ाओ,
सन्तन की सेवा ॥

सर्व चिंता आणि आजार नष्ट करा. पापातून मुक्ती द्या. आमच्या मनातील श्रद्धा आणि भक्ती वाढवा कारण आमचं मन विचलित होत असतं. सर्व संतांचे रक्षण करा प्रभू. (Om Jai Jagdish Hare Aarti)

ॐ जय जगदीश हरे,
स्वामी जय जगदीश हरे ।
भक्त जनों के संकट,
दास जनों के संकट,
क्षण में दू करे ॥

हे विष्णू भगवान, तुम्ही साक्षात जगदीश म्हणजे जगाचे ईश्वर आहात, तुम्ही जगाचे स्वामी आहात. तुम्ही भक्तांचे, दासांचे संकट क्षणात दूर करता. (Om Jai Jagdish Hare Aarti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.