Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेत Ajit Pawar यांनी, शरद पवारांवर साधला निशाणा!

अजित पवार हे शरद पवारांवर थेट बोलू शकत नाही, अशी टीका त्यांच्यावर केली जात होती. मात्र, आता अजितदादांनी रोहित पवारांवर नेम साधत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

117
Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेत Ajit Pawar यांनी, शरद पवारांवर साधला निशाणा!

लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024 ) निवडणुकीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी बारामतीत निवडणूक (Baramati Election Meeting) सभेला रविवारी संबोधित केले. यावेळी निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, बारामतीतील अनेक कारखाने आम्ही आणले, शिक्षण संस्था आम्ही काढल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते सांगत आहेत. यासंबंधी शरद पवार थेट बोलू शकत नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांना व्यासपीठावर आणत आहेत. असा टोला अजित पवार यांनी भर सभेतून शरद पवार यांना लगावला. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : शाहू महाराज स्वत:हून वारसदार म्हणवतात; राजवर्धनसिंह कदमबांडेंचं टीकास्र)

पुढे अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कारखाना आम्ही आणला. एमआयडीसी आम्ही आणली. संस्था आम्ही काढल्या असे सांगतात. या बारामतीतील डायनामिक्स कंपनी ही माझ्या उपस्थितीत झाली. त्यानंतर अनेक कंपन्यांचे प्रश्न मी सोडवले आहेत. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण संस्थेचा मुद्दा सांगताना, पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर नेम धरला, काहीजण वालचंदनगरला शिकत होते, त्यावेळी फक्त वालचंदनगरलाच चांगले शिक्षण मिळत होते, बारामतीत मिळत नव्हते, असे सांगून त्यांनी शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान काढली या मुद्द्याला छेद देत शरद पवारांना टोला मारला. (Ajit Pawar)

(हेही वाचा –  Lok Sabha Election 2024: ‘हा’ निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी घ्यायला हवा होता, पंतप्रधानांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल)  

१४० कोटी जनतेचा कारभाराची ही निवडणुक आहे. सुज्ञ मतदार याचा बारकाइने विचार करतील. मागे वेगवेगळे पंतप्रधान होऊन गेले. मात्र, जनतेशी संपर्क असणारा, शेतकऱ्यांच्या समस्या समजुन घेणारा, त्यांची कामे मार्गी लावण्याचा पायंडा नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पाडला. जो यापुर्वीच्या पंतप्रधानांनी पाडलेला नव्हता. १० वर्ष पंतप्रधान पदावर असताना देखील एक देखील मोदींवर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडला नसल्याचे पवार यांनी यावेळी सभेत नमुद केले. (Ajit Pawar)

अजित पवार काय म्हणाले ?
तुम्ही सुन म्हणुन आल्यानंतर घरचे होता. बाहेरची होत नाही. आमच्यात ४० वर्षानंतर देखील सुन बाहेरचीच म्हणुन उल्लेख केला जातो. आता तुम्हाला राग आला पाहिजे. ४० वर्ष तुमच्या घरात कष्ट करुन देखील तुम्ही तिला बाहेरचीच म्हणता, हा कुठला न्याय, तुम्ही महिलांचा अपमान करता, त्यांना मान सन्मान द्यायला शिका, अशी देखील टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता केली. (Ajit Pawar)

मुलगी सुन झाल्यावर त्या घरची लक्ष्मी होते. मुलगी माहेरी आल्यावर आई तिला चार दिवस भावजयीबरोबर आनंदामध्ये रहा, असे सांगते. मात्र, त्याचा वेगळा अर्थ काढु नका शहाण्यांनो. नणंद घरी आल्यावर तिला साडीचोळीने ओटी भरा, जावयाला पोषाख करुन त्यांची पाठवणी करा. मला म्हणायचं होतं, अर्थात बटण दाबुन नव्हे, अशी मिश्कील टीपणी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव न घेता केली. (Ajit Pawar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.