BMC : शिवडीतील पर्जन्य जलवाहिनीच्या कामांत निष्काळजीपणा, कंत्राटदाराला बजावली महापालिकेने नोटीस

शिवडी येथील हाजी बंदर रोडवरील गाडी बंदर जवळ तसेच रुपजी कानजी चाळी जवळ एल अँड टी गेट नंबर १ समोर पेटीका नाल्याचे बांधकाम सुरु असताना २४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच कंत्राटी कामगार हे पेटीका नाल्यात पडले होते.

397
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान

शिवडी येथील गाडी बंदर रोड येथे सुरु असलेल्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींचे काम सुरु असतानाच पाच कामगार आत पडून गंभीर जखमी झाले होते. त्यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाल्याच्या कंत्राट कामांमधील निष्काळजीपणाबाबत संबंधित एक्युट डिझाईन कंत्राट कंपनीला महापालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नाल्याच्या बांधकामात कंत्राट कंपनीकडून योग्य ती दक्षता न घेतल्याची बाब समोर आल्याने या कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BMC)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पवार काका-पुतणे उमेदवारांची यादी जाहीर करत नाहीत)

शिवडी येथील हाजी बंदर रोडवरील गाडी बंदर जवळ तसेच रुपजी कानजी चाळी जवळ एल अँड टी गेट नंबर १ समोर पेटीका नाल्याचे बांधकाम सुरु असताना २४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच कंत्राटी कामगार हे पेटीका नाल्यात पडले होते. या पाचही कामगारांना स्थानिकांनी त्वरीत बाहेर काढले. त्यातील एका १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर उर्वरीत चार कामगारांना केईएम रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु केले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर होती आणि इतर तिघांची प्रकृती स्थिर होती. (BMC)

मात्र पेटीका नाल्याचे बांधकाम करताना महापालिकेने (BMC) नेमलेल्या कंत्राटदाराकडून कोणत्यहा प्रकारची काळजी घेतली नसल्याची बाब लक्षात घेता महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने संबंधित एक्युट डिझाईन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाने दिली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.