Govinda साठी ही निवडणूक कठीण…

महायुतीचे पारडे या लोकसभा मतदार संघात जड मानले जात असले तरी मुंबईबाहेरचा, अमराठी उमेदवार कितपत टीकाव धरेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

126
Govinda साठी ही निवडणूक कठीण...

मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर असल्याने जागावाटपात या मतदार संघावर शिवसेना (शिंदे) दावा केला आहे. गुरुवारी २८ मार्चला काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेता गोविंदा (Govinda) आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदा (Govinda) यांच्या प्रवेशामुळे तेच उत्तर-पश्चिम या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तिकर यांच्यासमोर असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसे झाल्यास अमोल कीर्तिकर यांना ही निवडणूक सोपी जाणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. (Govinda)

या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असून अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी आणि जोगेश्वरी पूर्व यामध्ये तीन भाजपाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून दोन शिवसेना उबाठा आणि एक शिवसेनेचा (शिंदे) आमदार आहे. महायुतीचे पारडे या लोकसभा मतदार संघात जड मानले जात असले तरी मुंबईबाहेरचा, अमराठी उमेदवार कितपत टीकाव धरेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, याचे कारण… (Govinda)

(हेही वाचा – Notice to Congress: इन्कम टॅक्सकडून काँग्रेसला १७०० कोटींची नोटीस)

गोविंदा यांची जमेची आणि कमकुवत बाजू..

जमेची बाजू :

  • परिचित चेहेरा
  • प्रसिद्ध अभिनेता
  • खासदारकीचा अनुभव
  • अमराठी असूनही मराठी बोलतात
  • नवखा मतदार संघ

कमकुवत बाजू :

  • ‘विरार का छोरा’ हा शिक्का
  • स्थानिक उमेदवार नाही
  • अमराठी चेहेरा
  • पूर्वाश्रमीचा काँग्रेसवासी
  • खासदारकीची कामगिरी असमाधानकरक
  • विभागात संपर्क कमी
  • अमोल कीर्तिकर यांची जमेची आणि विरोधातील बाजू

जमेची बाजू :

  • मराठी चेहेरा
  • स्थानिक उमेदवार
  • वडील खासदार
  • ठाकरे कुटुंबाशी जवळीक
  • वडिलांच्या खासदारकीमुळे विभागात मतदारांशी संपर्क
  • ईडी कारवाईमुळे सहनुभूतीची शक्यता

कमकुवत बाजू :

  • पहिलीच निवडणूक
  • खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी
  • काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचा विरोध
  • महाविकास आघाडी कमजोर
  • सगळी भिस्त शिवसेना उबाठावर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.