Ujjwal Nikam: भाजपा संविधान बदलणार का ? उज्ज्वल निकम म्हणाले…

भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, आपण आपला मूळ स्वभाव कधीही बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.

191
Ujjwal Nikam: पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार का? उज्ज्वल निकम म्हणाले...

लोकसभा मतदारसंघात भाजपाने (Lok Sabha Election 2024) नवाच चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिलाय. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम (ujjwal nikam vs varsha gaikwad)अशी लढत रंगणार आहे.

भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, आपण आपला मूळ स्वभाव कधीही बदलणार नसल्याचे स्पष्ट केले तसेच त्यांच्या निर्भीड आणि  नि:स्पृह स्वभावाविषयी त्यांनी सांगितले की, भाजपाचं सरकार आल्यास संविधान बदलणार, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होतो, त्यासंदर्भात निकम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी उत्तर दिलं की, राजकारणात आरोप केल्यानंतर त्यास कसं उत्तर द्यायचं, याची चर्चा आमच्या राजकारणातील धुरंदर लोकांशी चर्चा करेन. त्यातून, कायदेशीर व अशांतता पसरणार नाही, याची ग्वाही मी देतो. राजकारणात स्पष्टवक्तेपणा चालत नाही, पण मी माझा निर्भीड व नि:स्पृह स्वभाव सोडणार नाही हे तुम्हाला पुढील काही दिवसांत कळेल, असेही निकम यांनी म्हटले.

(हेही वाचा – Deep Cleaning : गगराणी यांनी ठेवले सफाई कामगारांच्या खांद्यावर हात, मिळवले कामगारांच्या हृदयात स्थान)

मोदींनी भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय दर्जावर नेली…
मी सर्वांचा आभारी आहे, मला देण्यात आलेली ही मोठी जबाबदारी आहे. पण, राजकीय क्षेत्राचा मला अनुभव नाही. देशहिताचे खटले लढणे आणि लोकांना विश्वास देण्याचे काम मी आजपर्यंत केले आहे. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचे काम भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे सांगत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल नरेंद्र मोदींसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे उज्जल निकम यांनी आभारही मानले.

न्यायाकरिता झगडणं हे माझ्या रक्तात
प्रतिस्पर्धी वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, आज संकष्टी आहे, गणपतीचा दिवस आहे. त्यात, हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कुणाला कमी लेखत नाही; परंतु एक गोष्ट निश्चित आहे, सत्यासाठी आणि न्यायाकरिता झगडणं हे माझ्या रक्तात आहे. त्यामुळे, आजपर्यंत गेल्या ४० ते ४५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कुठल्याही आरोपीचं मी प्रतिनिधित्व केलं नाही. याउलट खोट्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना सोडावं, अशी धाडसी भूमिका मी घेतलेली आहे, अशा आठवणींनाही त्यांनी मोकळी वाट केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.