Deep Cleaning : गगराणी यांनी ठेवले सफाई कामगारांच्या खांद्यावर हात, मिळवले कामगारांच्या हृदयात स्थान

सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत.

4980
Deep Cleaning : गगराणी यांनी ठेवले सफाई कामगारांच्या खांद्यावर हात, मिळवले कामगारांच्या हृदयात स्थान

महापालिकेच्यावतीने मुंबईत मागील २३ आठवड्यापासून सुरु असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत (डिप क्लिनिंग) नवे महापालिका आयुक्त प्रथमच सहभागी झाले. इक्बालसिंह चहल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आयुक्त म्हणून आलेल्या भूषण गगराणी यांनी या सखोल स्वच्छता मोहिमेत आतापर्यंत भाग घेतला नव्हता. परंतु सहा आठवड्यानंतर गगराणी यांनी मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत सहभागी होत हाती पाण्याचा पाईप आणि झाडूही घेतली. विशेष म्हणजे गगराणी यांनी या मोहिमेत भाग घेत मुख्यमंत्र्यांप्रमाणे सफाई कामगारांची मनेच जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सफाई कामगारांच्या खांद्यावरच हात टाकत फोटो काढला आणि कामगारांच्या ह्दयात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Deep Cleaning)

मुंबई महानगरात गत २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवरी २७ एप्रिल २०२४ सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Deep Cleaning)

New Project 2024 04 27T210854.743

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून केलेल्या दौऱ्यात स्वच्छतेच्या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्‍त (परिमंडळ ७) रमाकांत बिरादार, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) संजोग कबरे, उप आयुक्‍त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्‍त (परिमंडळ ३) विश्‍वास मोटे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्‍यासह सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, सहायक आयुक्त (सी विभाग) उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) स्‍वप्‍नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त (एस विभाग) भास्‍कर कसगीकर यांच्यासह संबंधित अधिकारी,कर्मचारी तसेच स्‍थानिक नागरिक उपस्थित होते. (Deep Cleaning)

सार्वजनिक स्‍वच्‍छता हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्‍य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्‍हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. ही मोहीम यापुढेही सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्‍वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. स्‍वच्‍छता मोहीम राबविल्‍यानंतर तो परिसर कायम स्‍वच्‍छ व सुंदर ठेवण्‍याची जबाबदारी नागरिकांचीही आहे, असे नमूद करुन मुंबईकर नागरिकांनी स्‍वच्‍छता मोहिमेत सहभागी व्‍हावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. (Deep Cleaning)

New Project 2024 04 27T211007.626

प्रारंभी ए विभागातील कुलाबा परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथून महानगरपालिका आयुक्त गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. त्यानंतर सी विभागातील मुंबादेवी मंदीर परिसरात अग्यारी गल्ली येथे भेट देवून आयुक्तांनी स्वतः स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. एच पश्चिम विभागात वांद्रे पश्चिममध्ये लीलावती रुग्णालय परिसर, एच पूर्व विभागात सांताक्रूझ पूर्व भागात प्रभात कॉलनी, एल विभागात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन इत्यादी ठिकाणी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी स्वच्छता मोहिमेतील कामांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामकाजाची पद्धती, वेळ, कामकाजातल्या अडी-अडचणी यांची देखील त्यांनी माहिती घेतली. यावेळी आयुक्तांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या कामाचा गौरव केला आणि त्यांना एकप्रकारचा आत्मविश्वास दिला. आयुक्तांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवल्याने हेच आमचे आयुक्त अशाप्रकारचा भाव कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आणि एकप्रकारे आयुक्तांनी या कृतीद्वारे कामगारांच्या ह्दयात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या आयुक्तांकडून कामगारांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. (Deep Cleaning)

(हेही वाचा – Narendra Modi: शिवसेनेने कॉंग्रेससोबत जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावले; पंतप्रधानांनी ठाकरेंवर साधला निशाणा)

स्‍वच्‍छता मोहिमेसाठी प्रक्रिया केलेले पाणी

यानिमित्ताने प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त गगराणी म्‍हणाले की, सखोल स्‍वच्‍छता मोहिमेचे सातत्य टिकवले जाणार आहे. महानगरपालिकेने कितीही व्यापक स्‍वच्‍छता केली तरी लोकसहभाग असेल तरच या मोहिमेला खरे यश मिळू शकेल. आगामी काळात देखील स्‍वच्‍छतेकामी अधिक प्रभावीपणे कार्यवाही केली जाईल, एकूणच, मुंबईकरांच्‍या आरोग्‍यास प्रशासनाकडून सर्वोच्‍च प्राधान्‍य दिले जात आहे. सखोल स्‍वच्‍छता मोहिमेसाठी प्रक्रिया केलेले पाणी (रिसायकल वॉटर) वापरात येते. यातून हे सिद्ध होते की, पाण्‍याची नासाडी होते, या दाव्यामध्ये काहीही तथ्‍य नाही. महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ‘रिसायकल वॉटर’ उपलब्ध आहे, असेही आयुक्‍त महोदयांनी निक्षून सांगितले. (Deep Cleaning)

नाल्यातील गाळ काढण्‍याची कामे गतीने

पुढे ते म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. या कामांचा विभागवार आढावा घेतला असून यंत्रणांना योग्‍य ते निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विविध शासकीय विभागांसोबत तसेच इतर प्राधिकरणांसोबत बैठका घेऊन त्यांना देखील आवश्यक ते निर्देश दिले आहेत. मोठे नाले छोटे -नाले यातून गाळ काढण्‍याची कामे गतीने सुरू आहेत. ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ही सर्व कामे पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्याबाबतही विभागपातळीवर बैठका घेतल्या आहेत. दुययम अभियंता, कनिष्‍ठ अभियंता यांच्‍यासह प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर कार्यरत असणाऱ्या सगळ्यांकडून एकदा ‘फिडबॅक’ घेतला आहे. (Deep Cleaning)

सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर

रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे सुरू आहेत, ती कामे प्राधान्‍याने पूर्ण करावीत, यावर भर दिला जात आहे. राडारोडा, बांधकाम साहित्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी, असे स्‍पष्‍ट निर्देश दिले आहेत. सखल भागातील पाणी निचरा करण्‍यासाठी पंप कार्यान्वित रहावेत, अधिकाधिक यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करावी जेणेकरुन मुंबईकरांना भेडसावणा-या समस्‍या मार्गी लागतील, आदी निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत, असेही आयुक्‍त महोदयांनी नमूद केले. (Deep Cleaning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.