Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, ८ जण गंभीर जखमी

173
Punjab Accident: पंजाबमधून काश्मीरमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून फिरायला आलेल्या ४ पर्यटकांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर असलेल्या बोरघाटामध्ये भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ३ वाहनांचा विचित्ररित्या अपघात झाला. या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, (१० मे) पहाटे सव्वाचा वाजण्याच्या सुमारास माहामार्गावर हा अपघात झाला. मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी कार, पाइप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्यांना घेऊन जाणारा टेम्पो ही वाहेने एकमेकांवर धडकली. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली.

(हेही वाचा –  Anemia : जगातील २०० कोटी लोक आहेत ‘या’ आजाराचे बळी)

जखमी झालेल्या ८ जणांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.