1 May Financial Changes : मे महिन्यापासून ‘या’ आर्थिक गोष्टी बदलणार

1 May Financial Changes : गॅस सिलिंडरच्या दरापासून मेमध्ये हे महत्त्वाचे बदल होणार आहेत. 

516
1 May Financial Changes : मे पासून ‘या’ आर्थिक गोष्टी बदलणार
  • ऋजुता लुकतुके

येत्या मे महिन्यात काही बँकांचे नियम बदलणार आहेत. एलपीजी सिलिंडरचाही भाव बदलण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल. येत्या १ मेपासून अनेक नियमांत बदल होणार आहे. (1 May Financial Changes)

येस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या १ मेपासून (1 May) काही नियम बदलणार आहेत. येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवरील किमान सरासरी ठेवीमध्ये (मिनिमम अॅव्हरेज बँलेन्स) बदल करण्यात आला आहे. येस बँकेच्या प्रो मॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम अॅव्हरेज बँलेस ५०,००० रुपये होणार आहे. सेव्हिंग अकाऊंट प्रो प्लस येस रिस्पेक्ट तसेच येस इसेन्स या खात्यांमध्ये मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स २५,००० रुपये करण्यात आले आहे. अकाऊंट प्रो प्रकारच्या बँक खात्यात दहा हजार मिनिमम बॅलेन्सची अट ठेवण्यात आली आहे. (1 May Financial Changes)

(हेही वाचा – Narendra Modi: शिवसेनेने कॉंग्रेससोबत जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावले; पंतप्रधानांनी ठाकरेंवर साधला निशाणा)

‘हे’ होणार बदल 

आयसीआयसीआय बँकेचेही येत्या १ मेपासून (1 May) अनेक नियम बदलणार आहेत. ही बँक सेव्हिंग खात्यांच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदल करणार आहे. तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डवर ९९ रुपये, शहरी भागातील ग्राहक असाल तर २०० रुपये फी (प्रतिवर्ष) द्यावी लागणार आहे. तुम्हाला बँकेचे २५ पानांचे चेक बुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. २५ पेजनंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला ४ रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला आयएमपीएसने एक हजार रुपयांपर्यंतचे ट्रान्जेक्शन करत असाल तर प्रति ट्रान्जेशन २.५० रुपये द्यावे लागतील. १ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत ट्रान्जेशन करत असाल तर पाच रुपये प्रति ट्रान्जेशन फी द्यावी लागेल. (1 May Financial Changes)

एचडीएफसी ही बँक खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेडकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडीय योजना म्हणजेच एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना राबवली जाते. या योजनेच्या मुदतीत १० मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ०.७५ टक्क्यांचं अतिरिक्त व्याज देत आहे. या योजनेनुसार ग्राहकांना ५ ते १० वर्षांपर्यंतच्या एफडी स्कीम वर ७.७५ टक्के व्याज दराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांत बदल करते. त्यामुळे एक मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे. (1 May Financial Changes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.