IPL 2024 MI vs DC : ‘आज बॅटिंग तेरा भाई करेगा,’ म्हणत जसप्रीत बुमराचा फलंदाजीचा सराव

IPL 2024 MI vs DC : मुंबई इंडियन्सच्या सरावाच्या वेळी जसप्रीत बुमराने एक तास फलंदाजीचा सराव केला. 

113
IPL 2024 MI vs DC : ‘आज बॅटिंग तेरा भाई करेगा,’ म्हणत जसप्रीत बुमराचा फलंदाजीचा सराव
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या बाद फेरीत पोहोचण्याासठी घडपडतोय. त्यामुळेच असेल कदाचित पण, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराने आता बॅटही हातात घ्यायची ठरवली आहे. त्याने शुक्रवारी फलंदाजीचा जोरदार सराव केला. मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी यात या हंगामात सातत्य नाहीए. (IPL 2024 MI vs DC)

गोलंदाजीत जसप्रीत सध्या अव्वल आहे. पण, त्याचबरोबर फलंदाजीतही संघाला हातभार लावण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय. तो फलंदाजी करतानाचा व्हीडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हीडिओचा मथळा फँचाईजीने दिला आहे, ‘अब बॅटिंग तेरा जस्सीभाई करेगा!’ (IPL 2024 MI vs DC)

(हेही वाचा – कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात निवडणूक नाहीच, ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी; Devendra Fadanvis यांचा घणाघात)

मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत ‘या’ स्थानावर

दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आतापर्यंत ४ विजय आणि ५ पराभवांची नोंद केली आहे. आणि त्यांचे एकूण ८ गुण झाले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ ३ विजय आणि ५ पराभवांसह ६ गुण मिळवत गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनी मुंबईचा ९ गडी राखून पराभव केला होता. (IPL 2024 MI vs DC)

जसप्रीत बुमरा हा मुंबईचा या हंगामातील आघाडीचा गोलंदाज आहे आणि त्याने ८ सामन्यांत १३ बळी मिळवले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे १५ धावांत ५ बळी. आणि त्याची सरासरी आहे १५.०९ धावांची. सध्या पर्पल कॅपही त्याच्याच नावावर आहे. (IPL 2024 MI vs DC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.