IPL 2024 Virat Kohli : विराट कोहली ४ हंगामात ६०० च्या वर धावा करणारा दुसरा फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : पंजाब विरुद्ध विराटने १९५ धावांचा स्ट्राईकरेटही गाठला.

63
IPL 2024 Virat Kohli : विराट कोहली ४ हंगामात ६०० च्या वर धावा करणारा दुसरा फलंदाज
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलसारख्या (IPL) दीर्घ काळ चालणाऱ्या स्पर्धेत तुमचा फॉर्म टिकवून ठेवून कामगिरीत सातत्य ठेवणं हे मोठं आव्हान आहे. आणि अशावेळी कामगिरीचा सातत्याने डंका वाजवण्याच्या बाबतीत के एल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोन भारतीय फलंदाज आयपीएलचे स्टार फलंदाज आहेत. दोघांनी ४ हंगामात ६०० च्या वर धावा करण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज ३५ व्या वर्षीही विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हवा हवासा वाटणारा खेळाडू आहे. गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध धरमशाला इथं झालेल्या सामन्यात विराटने ४७ चेंडूंत ९२ धावांची खेळी केली. आणि त्याचबरोबर आयपीएलमध्ये या हंगामात ६०० धावांचा टप्पा पूर्ण केला. आणि अशी कामगिरी त्याने आतापर्यंत ४ हंगामात केली आहे. (IPL 2024 Virat Kohli)

के एल राहुल आणि विराट यांनी ४ वेगवेगळ्या हंगामात प्रत्येकी ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर त्यांच्या खालोखाल डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी तीन हंगामात केली आहे. तर विराटचा बंगळुरू संघातील कर्णधार फाफ दू प्लेसिसने ही कामगिरी दोन हंगामात केली आहे. (IPL 2024 Virat Kohli)

(हेही वाचा – IPL 2024 Play-Off Chances : उर्वरित साखळी सामन्यांतून कुणाला बाद फेरीची संधी?)

सर्वाधिक हंगामात ६०० च्या वर धावा

  • विराट कोहली व के एल राहुल – ४
  • ख्रिस गेल व डेव्हिड वॉर्नर – ३
  • फाफ दू प्लेसिस – २ 

गुरुवारी विराटला (Virat Kohli) स्ट्राईक रेटवरून चिडवणाऱ्यांची तोंडंही त्याने बंद केली. त्याच्या ९२ धावांमध्ये ६ षटकार आणि ७ चौकार होते. आणि १९८ धावांच्या स्ट्राईकरेटने त्याने धावा केल्या. यात त्याला दोन जीवदानंही मिळाली. पण, त्याचा फायदा उचलत त्याने बंगळुरूची धावसंख्या भराभर वाढवली आणि सामना संपल्यानंतर त्याने स्ट्राईकरेटवरून टीका करणाऱ्यांना आपल्या भाषेत उत्तरही दिलं. ‘माझ्यासाठी अजूनही संख्येपेक्षा दर्जा जास्त महत्त्वाचा आहे,’ असं विराट म्हणाला. (IPL 2024 Virat Kohli)

बंगळुरू संघाने आता सलग चार विजय मिळवत १० गुणांची कमाई केली आहे आणि ते सातव्या क्रमांकावर आहेत. उर्वरित दोन सामने जिंकून बाकीच्या सामन्यांचे निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागले तर त्यांना अजूनही बाद फेरीची आशा आहे. पण, ती शक्यताही खूप कमी आहे. (IPL 2024 Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.