Conversion : तरुणीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करणाऱ्या तरुणाला अटक

अमीनने तिला बळजबरीने नमाज पठण व रोझे ठेवण्यास देखील सांगितले

130
conversion : तरुणीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करणाऱ्या तरुणाला अटक

जून २०२२ रोजी मीरारोड येथील एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला बळजबरीने धर्मांतर (Conversion) करायला लावणारी धक्कादायक घटना घडली होती. नयानगर पोलिसांनी आता या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीन शेख आणि पाच जणांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

मीरारोड येथील एका २२ वर्षीय तरुणीची तिच्याच मैत्रिणी मार्फत आरोपी अमीन सोबत मैत्री झाली. त्यानंतर माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं अमीनने तरुणीला सांगितले. मात्र तिने तिच्या प्रेमाला नाकारलं. त्यानंतर आरोपी अमीन याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्या धमकीनंतर तरुणीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या भावाची मुलगी आजारी आहे असं सांगून तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर अमीनने तिच्यासोबत शारीरिक चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार करून तिचे नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच २१ जून २०२२ रोजी तिचे बळजबरीने धर्मांतर (Conversion) देखील केले. त्यानंतर त्याने तरुणीला अन्य मुलींसोबत दुबईला जाण्यास सांगितले. त्यावर तिने नकार दिला असता अमीनने तिला मारहाण केली. तसेच तिला बळजबरीने नमाज पठण व रोझे ठेवण्यास देखील सांगितले.

(हेही वाचा – Narendra Modi : ‘हे तर भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या बैठकीवर केली टीका)

आजपासून तुझे नाव राहिमा (Conversion) असल्याचे त्याने तिला सांगितले. त्यानंतर तो तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन गेला. तेव्हा आजारी असणारी लहान मुलगी ही त्याच्या भावाची नसून त्याचीच असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर अमीन याने त्याच्या मित्राच्या घरी तरुणीला बरेच दिवस एका खोलीत कोंडून ठेवले. तिथून तिने शेजारी आणि पोलिसांच्या मदतीने आपली सुटका करून घेतली आणि आपल्या वडिलांच्या घरी आली. मात्र तिचे व्हिडीओ अमीनकडे असल्याने ती पुन्हा त्याच्याकडे निघून गेली. शेवटी ती न घाबरता पोलिसांकडे गेली आणि सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदून घेत या प्रकरणाची चौकशी केली. अमीन याला अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेट वनकोटी याच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.