मुंबईतील जोगेश्वरी येथून दोन संशयितांना अटक, आयएसआय एजंटच्या दोघे होते संपर्कात

112
मुंबईतील जोगेश्वरी येथून दोन संशयितांना अटक, आयएसआय एजंटच्या दोघे होते संपर्कात
मुंबईतील जोगेश्वरी येथून दोन संशयितांना अटक, आयएसआय एजंटच्या दोघे होते संपर्कात

पाकिस्तानच्या आयएसआय एजंटच्या संपर्कात असणाऱ्या दोन संशयितांना मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून सोमवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसने ही कारवाई केली असून दोघांना अटक करून उत्तर प्रदेश एटीएस घेऊन गेले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने यापूर्वी अटक केलेल्या संशयित आयएसआय एजंट मोहम्मद रईसला हे दोघे मदत करीत होते, तसेच पाकिस्तान मधील त्याच्या हँडलरला भारतीय लष्करी आस्थापनांची माहिती पुरवल्याचा आरोप या दोघांवर आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूपी एटीएसने रविवारी संशयित आयएसआय एजंट रईस याला उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती, त्याच्या चौकशीत मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे संशयित सय्यद अरमान (६२) आणि मोहम्मद सलमान सिद्धिक (२४) यांची नावे समोर आली.

सोमवारी यूपी एटीएसच्या पथक मुंबईत दाखल झाले होते, त्यांनी मुंबई एटीएसची मदत घेऊन जुहू येथील एटीएस युनिटच्या अधिकारी यांच्यासह जोगेश्वरी येथे सर्च ऑपरेशन हाती घेऊन सय्यद अरमान आणि मोहम्मद सलमान सिद्धीकी या दोघांना ताब्यात घेण्यात आले, या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांना ट्रान्झिट रिमांड अंतर्गत उत्तर प्रदेशात नेण्यात आले, असे महाराष्ट्र एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अरमान हा एका पाकस्थित आयएसआय एजंटच्या संपर्कात होता आणि त्याने रईसला उत्तर प्रदेशातील लष्करी प्रतिष्ठानांची तपासणी करण्यासाठी आणि पाकिस्तान मधील हँडलरला माहिती पुरवण्यासाठी भरती केले होते. अरमान जोगेश्वरीमध्ये चहाचा स्टॉल चालवतो तर त्याच परिसरात सलमानचे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. त्यांच्या चौकशीत समोर आले आहे की अरमान रईसला आर्थिक मदत करत होता आणि त्याने त्याला अनेक वेळा पैसे पाठवले होते.

मुंबईत जन्मलेल्या अरमान मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील आहे, मुंबईत लहानाचा मोठा झालेला अरमान हा पाकस्थित आयएसआय एजंटच्या संपर्कात आला आणि त्याने गुप्तपणे आयएसआयसाठी काम सुरू केले होते. यूपीतून अटक करण्यात आलेला रईस हा गेल्या वर्षी कामानिमित्त मुंबईत आला आणि अरमानच्या घरी थांबला होता, रईसला कामासाठी सौदी अरेबियाला जायचे होते, पण अरमानने त्याला चहाचे स्टॉल चालवयला दिले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, अरमानने रईसला भारताच्या लष्करी आस्थापनांची माहिती गोळा करण्यास सहमती दर्शविल्यास त्याला मोठी रक्कम देण्यात येईल असे अमिष दाखवले होते.

(हेही वाचा – Delhi Flood : चार दिवसांनंतर पुन्हा यमुनेच्या पाणी पातळीत वाढ)

रईस याने अरमानचा प्रस्ताव मंजूर करून काम करण्यास सहमती दर्शवली होती असे रईसच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर रईस हा उत्तर प्रदेशात निघून गेला आणि त्यानंतर त्याला एका हुसैनी नावाच्या व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला होता, त्याने त्याला संरक्षण आस्थापनांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते असेही चौकशीत समोर आले आहे. पाकिस्तानातून आलेले पैसे अरमानकडे आले, त्याने ते रईसला दिले होते अशी माहिती रईसच्या चौकशीत समोर आली, त्यानेच अरमान हा मुंबईतील जोगेश्वरी येथे असल्याची माहिती यूपी एटीएसला दिली, त्यानंतए यूपी एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने जुहू अरमान आणि सलमानला अटक केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.