Raja Chhatrasal : छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन ’राजा छत्रसाल’ यांनी निर्माण केले होते स्वराज्य?

राजा छत्रसाल यांनी अनेक वर्षे मुघलांविरुद्ध लढा देऊन आपले मोठे राज्य निर्माण केले.

85
Raja Chhatrasal : छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन ’राजा छत्रसाल’ यांनी निर्माण केले होते स्वराज्य?

राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) हे पन्ना येथील राजा होते. त्यांनी मुघलांच्या विरोधात कडवी झुंज दिली होती. छत्रसाल यांचा जन्म ४ मे १९४९ साली टिकमगढ येथील कचर कचनाई येथे एका राजपूत घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव चंपत राय आणि आईचं नाव सारंध असं होतं. छत्रसाल बारा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना मुघलांनी ठार मारले. त्या काळी औरंगजेबाचं राज्य होतं. छत्रसाल २२ वर्षांचे असताना १६७१ साली त्यांनी बुंदेलखंड येथे मुघलांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी त्यांच्यासोबत पाच घोडेस्वार आणि पंचवीस तलवार घेतलेले सशस्त्र सैन्य होते. (Raja Chhatrasal)

राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) यांनी १७२० सालच्या दशकामध्ये स्वतःचे राज्य मुघलांपासून मुक्त असलेलं घोषित केलं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती. १७२८ सालापर्यंत राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) यांनी आपलं राज्य मुघलांपासून सुरक्षित ठेवलं. पण त्यानंतर मुहम्मद बंगश खान याने बुंदेलखंडवर हल्ला चढवला. त्यावेळी राजा छत्रसाल हे ७९ वर्षांचे होते. तरीही त्यांनी मुहम्मद बंगश खानच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या सैन्याचं नेतृत्व केलं. ते युद्ध खूप भीषण होतं. त्या भयानक नरसंहारी युद्धानंतर राजा छत्रसाल यांना माघार घ्यायला भाग पडलं गेलं. राजा छत्रसाल यांचा पराभव झाला. मुघलांनी त्यांच्या जैतापूर येथील किल्ल्याभोवती वेढा घातला आणि बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. (Raja Chhatrasal)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

त्यावेळी राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) यांनी पाहिले बाजीराव पेशवे यांना मदतीसाठी अनेक पत्रे धाडली. पण बाजीराव पेशवे त्यावेळेस स्वतःच मुघलांविरुद्धच्या लढायांत व्यग्र होते. ते राजा छत्रसाल यांना तात्काळ मदत करू शकले नाहीत. पण १७२९ साली बाजीराव पेशवे यांनी आपले सैन्य बुंदेलखंडच्या दिशेने वळवले आणि मुहम्मद बंगश खानच्या सैन्यावर हल्ला केला. मराठ्यांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे बंगश खान आणि त्याचे सैन्य पुरते गोंधळून गेले. त्याने मुघल बादशहाला मदतीसाठी पत्रे धाडली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. (Raja Chhatrasal)

राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) आणि बाजीराव पेशवे यांच्या सैन्याने मिळून तो संपूर्ण परिसर मुघलमुक्त केला. राजा छत्रसाल यांनी बाजीराव पेशवे यांना बुंदेलखंड येथील काही जमिनी आणि हिऱ्याच्या खाणी भेट म्हणून दिल्या. राजा छत्रसाल यांनी अनेक वर्षे मुघलांविरुद्ध लढा देऊन आपले मोठे राज्य निर्माण केले. त्यांचे देहावसान होण्याआधीच त्यांनी आपल्या राज्याचे तीन भाग करून आपल्या मुलांना सांभाळायला दिले. (Raja Chhatrasal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.