Mumbai Nashik Highway Accident : कंटेनर आणि जीपच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.

171
Mumbai Nashik Highway Accident : कंटेनर आणि जीपच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रस्ते अपघातात वाढ झाली आहे. अशातच पुन्हा एकदा एका (Mumbai Nashik Highway Accident) अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway Accident) भीषण अपघात झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा – Delhi Flood : चार दिवसांनंतर पुन्हा यमुनेच्या पाणी पातळीत वाढ)

नेमकी काय घडली घटना?

आज १८ जुलैच्या सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771 (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना हा भीषण अपघात (Mumbai Nashik Highway Accident) झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.

अपघाती मृत्यू झालेल्यांची नावं

१) चिन्मयी विकास शिंदे (वय १५)
२) रिया किशोर परदेशी
३) चैताली सुशांत पिंपळे (वय २७)
४)संतोष अनंत जाधव (वय ५०)
५)वसंत धर्मा जाधव (वय ५०)
६) प्रज्वल शंकर फिरके

तीन प्रवासी जखमी

१)दिलीप कुमार विश्वकर्मा (वय २९)
२)चेतना गणेश जसे (वय १९)
३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे (वय २२)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.