Accident: लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात, १५ वऱ्हाडी जखमी

114
Accident: पंढरपूर-कराड रोडवर भीषण अपघात, ६ महिला ठार, १ गंभीर जखमी

नांदेड ते देगलूर महामार्गावर लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाड घेऊन जात असलेल्या गाडीचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

नांदेड-देगलूर महामार्गावरील किन्हाळा गावाजवळ लग्नाला जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी येथील वऱ्हाडी देगलूर तालुक्यातील शहापूर या गावी लग्नासाठी जात होते. बिलोली तालुक्यातील किन्हाळा गावाजवळ या टेम्पोला अपघात झाला. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यालगत पलटी झाला. रस्त्यालगत असलेल्या एका खड्ड्यात या टेम्पोत असलेले पडले.

(हेही वाचा – Flight Travel: विमानातून प्रवास करताना परफ्युम्स आणि डिओड्रंट न्यायला बंदी, यामागचे नेमके कारण काय ? जाणून घ्या )

या अपघातात ४ जण अतिगंभीर तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना स्थानिकांनी जवळच्या नायगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.