Flight Travel: विमानातून प्रवास करताना परफ्युम्स आणि डिओड्रंट न्यायला बंदी, यामागचे नेमके कारण काय ? जाणून घ्या

काही लोकांना परफ्युमची अॅलर्जी असते.

118
Flight Travel: विमानातून प्रवास करताना परफ्युम्स आणि डिओड्रंट न्यायला बंदी, यामागचे नेमके कारण काय ? जाणून घ्या

वाढत्या उकडा आणि यामुळे येणारा घामाचा दुर्गंध. यापासून इतरांना होणारा त्रास दूर व्हावा तसेच स्वत:लाही उत्साही वाटावे, यासाठी लोकं परफ्युम्स, डिओड्रंटचा वापर करतात. उन्हाळ्यात ही सुगंधी द्रव्ये वापरण्याचे प्रमाण वाढते. प्रवासादरम्यान तर या सौंदर्य उत्पादनांचा आवर्जून वापर केला जातो, मात्र विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दोन्ही वस्तू वापरता येत नाहीत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून विमान कंपन्यांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत.

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियमानुसार, विमानातून प्रवास करताना परफ्युम्स आणि डिओड्रंट बॅगेजमध्ये ठेवता येणार नाहीत तसेच विमानात या वस्तू नेण्यास मनाई आहे. यामागचे कारण म्हणजे परफ्युम्स आणि डिओड्रंटमध्ये थोड्या प्रमाणात तरी अल्कोहोल असते. ज्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. अल्कोहोल असल्यामुळे हे दोन्ही पदार्थ ज्वलनशील आहेत.

(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठे षडयंत्र, Mohit Kamboj करणार पर्दाफाश )

परफ्युम्स आणि डिओड्रंटमध्ये प्रोपेलेंटस आणि सॉल्वेंटसारखे अनेक धोकादायक घटक असतात. या घटकांमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विमान प्रवासात ही दोन्ही सौंदर्य उत्पादन सोबत ठेवण्यास बंदी आहे.

अॅलर्जी
काही लोकांना परफ्युमची अॅलर्जी असते. त्यामुळे विमानात उपस्थित प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ नये म्हणून विमानात परफ्युम नेण्यास मनाई आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.