China Pneumonia: ‘चिनी न्यूमोनिया’मुळे मोदी सरकारकडून राज्यांना सूचना, जागतिक आरोग्य संघटनेने दिली ‘ही’ माहिती

राज्यांना रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

76
China Pneumonia: 'चिनी न्यूमोनिया'मुळे मोदी सरकारकडून राज्यांना सूचना, जागतिक आरोग्य संघटनेने दिली 'ही' माहिती
China Pneumonia: 'चिनी न्यूमोनिया'मुळे मोदी सरकारकडून राज्यांना सूचना, जागतिक आरोग्य संघटनेने दिली 'ही' माहिती

‘चिनी न्यूमोनिया’ (China Pneumonia) या तापाच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून चिनच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना मोदी सरकारकडून सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

या आजारामुळे काळजी करण्याचे कारण नसले तरी सर्व राज्यांना रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तीव्र ताप, श्वास घेताना त्रास होणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून या आजाराबाबत माहिती मागवली आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला)

देशांकडून खबरदारीची उपाययोजना
चीनमधून आलेल्या करोना विषाणूच्या उद्रेकाचा अनुभव असल्याने अनेक देशांकडून खबरदारीची उपाययोजना चिनी न्यूमोनिया आजारात घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही रविवारी याविषयी सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

निर्देश कोणते?
– एन्फ्लूएन्झावरील औषधे व लशी, रुग्णालयांतील उपलब्ध खाटांची संख्या, वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा, प्रतिजैविके, वैयक्तिक सुरक्षात्मक साधने, चाचणी संच, ऑक्सिजन प्रकल्पांची स्थिती आदी घटकांचा आढावा घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
– एन्फ्लूएन्झासदृश आजार तसेच तीव्र स्वरूपाचा श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांवर जिल्हा तसेच अन्य शासकीय रुग्णालयांनी विशेष लक्ष ठेवण्याची आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
-चीनमधील या आजारात लहान मुलांचे प्रमाण जास्त असल्याने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा – Muslim : रात्रभर पाकिस्तानी मौलानाची भाषण ऐकायचा, घरात जिहादी साहित्य सापडले; उत्तर प्रदेशातील हाश्मीने हिंदू कंडक्टरचे ‘सर तनसे जुदा’ करण्याचा केला प्रयत्न)

आजाराची लक्षणे
– रुग्णांच्या, विशेषत: लहान मुले व तरुणांच्या नाक-घशाचे स्वॅब नमुने विषाणू संशोधन व निदान करणाऱ्या केंद्रीय संस्थांकडे पाठवण्याचे आवाहन केले आहे.

– एन्फ्लूएन्झाच्या रुग्णांची सध्याची संख्या तसेच देशात अनेक ठिकाणी थंडी असल्याने श्वसनविकाराच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, याकडे केंद्राने लक्ष वेधले आहे.

– देशातील स्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, चीनमधील तापामुळे तूर्तास काळजी करण्याचे कारण नाही, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.