Sharad Pawar यांची पुन्हा पावसात सभा; राजकीय वर्तुळात चर्चा

156
Sharad Pawar यांची पुन्हा पावसात सभा; राजकीय वर्तुळात चर्चा

राजकीय वर्तुळात शरद पवार (Sharad Pawar) आणि पाऊस यांचं एक वेगळंच नातं आहे. साताऱ्यातील सभेनंतर पाऊस आणि शरद पवार हे समीकरण हिट झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा जनतेला हे समीकरण पाहायला मिळालं आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) काल म्हणजेच रविवार २६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये एनसीपीच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी पावसाने आपली हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांनी पावसात सभा घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा – Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान)

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

भर पावसात दोन मिनिटांच्या भाषणामध्ये पवार (Sharad Pawar) यांनी निराशा हा विषय मनामध्ये आणू नका. निराशेवर मात करून संघर्ष करून धैर्याने पुढे जाऊ, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

शरद पवार (Sharad Pawar) पुढे बोलतांना म्हणाले की, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानाचा सन्मान देशामध्ये केला जातो. परिस्थितीवर मात करून व निसर्गाची साथ असो किंवा नसो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी देशाच्या ऐक्यासाठी काम केले. महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम करून बचतगटाचा मेळावा आयोजित केला होता. पावसामुळे त्या निराश झाल्या होत्या. शरद पवार यांनी त्यांना धीर दिला. आपण निराश व्हायचे नाही,” असे त्यांनी बचतगटाच्या (Sharad Pawar)महिलांना सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.