Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान

विजांच्या कडकडटासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली.

79
Nashik: नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्याला (nashik rain) अवकाळी पावसाने झोपडून काढले. सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागांत पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या यापावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील निफाड सिन्नर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

(हेही वाचा – Muslim : रात्रभर पाकिस्तानी मौलानाची भाषण ऐकायचा, घरात जिहादी साहित्य सापडले; उत्तर प्रदेशातील हाश्मीने हिंदू कंडक्टरचे ‘सर तनसे जुदा’ करण्याचा केला प्रयत्न)

ऐन हिवाळ्यात नाशिक जिल्ह्यात सह राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाचं काही ठिकाणी आगमान झालं आहे. विजांच्या कडकडटासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट आता बाहेर काढले आहेत तर पावसामुळे गारवा देखील दुपटीने वाढला आहे. हवामान विभागाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.

दरम्यान, हवामान खात्याने आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचे म्हटलं जात असले तरी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

(हेही वाचा – Muslim : रात्रभर पाकिस्तानी मौलानाची भाषण ऐकायचा, घरात जिहादी साहित्य सापडले; उत्तर प्रदेशातील हाश्मीने हिंदू कंडक्टरचे ‘सर तनसे जुदा’ करण्याचा केला प्रयत्न)

जिल्ह्यात सिन्नरसह , मनमाड, निफाड आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. चांदवड, निफाड आणि मनमाड या पट्‌ट्यास गारपीटीचा तडाखा बसल्याने कांदा , द्राक्ष आदी पिके संकटात सापडली आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.