Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार – रेल्वे मंत्री

143
Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार - रेल्वे मंत्री
Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार - रेल्वे मंत्री

ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी केली जाईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. रेल्वे अपघाताची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Bihar : नितीश कुमारांचे अपयश : बिहारमध्ये निर्माणाधीन असलेला पूल दुसऱ्यांदा कोसळला )

ओडिशाच्या बालासोरमध्ये एक्स्प्रेस ट्रेनला झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ११००हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही बोगींमध्ये मृतदेह अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ३ जून रोजी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी पंतप्रधानांनी देखील या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केले होते. रेल्वे अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. तसेच त्यांनी ओडिशाच्या नागरिकांचे देखील यावेळी आभार मानले. बचावकार्यासाठी रेल्वेकडून युध्दपातळीवर काम करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले होते. ‘ही घटना अनेक गोष्टी शिकवून गेली आहे, त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न सरकारकडून करण्यात येतील’ असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.