Chatrapati Shivaji Maharaj : ‘बहुत जनांसी आधारु…’

पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज यांच्या आक्रमणापासून स्वराज्याला कायमस्वरूपी वाचवायचे असेल तर स्वत:चे आरमार असणे अतिशय आवश्यक आहे, अशी महाराजांची भूमिका होती.

166
Chatrapati Shivaji Maharaj : ‘बहुत जनांसी आधारु...’

श्रुतिका कासार

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजर होत आहे. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्मलेल्या शिवाजी शहाजी भोसले या एका मुलाने पुढे स्वराज्याची स्थापना करत संपूर्ण जगाला एक आदर्श राजा कसा असावा याची शिकवण दिली. एकाच वेळी मुघल, निजाम, इंग्रज, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंचा एकट्या शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने आणि गनिमी काव्याने सामना केला. हळूहळू स्वराज्याची सीमा सर्वदूर पसरू लागली. असे असले तरीही पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज यांच्या आक्रमणापासून स्वराज्याला कायमस्वरूपी वाचवायचे असेल तर स्वत:चे आरमार असणे अतिशय आवश्यक आहे, अशी महाराजांची भूमिका होती.

(हेही वाचा – chhatrapati shivaji maharaj : शिवराज्याभिषेक दिनासाठी सावरकर स्मारकातून पालखीचे रायगडाकडे प्रस्थान )

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांनी १६५९ साली मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. भारताच्या इतिहासात सर्वात आधी स्वतःचे आरमार उभे करण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. त्यामुळेच त्यांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ असे संबोधले जाते. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवस्यमेव करावे.’ महाराजांनी पत्रातून केलेल्या आरमाराच्या या उल्लेखातून त्यांची दूरदृष्टी समजते. 1657 मध्ये महाराजांनी कल्याण- भिवंडीचा परिसर काबीज केला. त्यामुळे सिद्धीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष होणे अपरिहार्य होते. सिद्धीचा सामना करायचा असेल व इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सर्वांना स्वराज्यापासून दूर ठेवायचे असेल तर आरमाराशिवाय पर्याय नव्हता हे महाराजांनी ओळखले होते.

महाराजांच्या ताफ्यातील जहाजांचे वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) आपल्या आरमारासाठी स्वतंत्र जहाज बांधणीचे कारखाने उभे केले. कल्याण जवळील दुर्गाडी किल्ल्यावर आरमाराचा कारखाना उभा करण्यात आला. इतिहासातील काही पुराव्यानुसार स्वराज्याच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचे दिसून येते.

जहाज बांधणीची कला

महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) आरमार उभारले खरे पण त्याचे शिक्षण स्वराज्यात तेव्हा कोणाकडेच नव्हते. म्हणून महाराजांनी आपल्या आरमाराला जहाज बांधणी कला शिकवण्यासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. आम्ही आमचे आरमार सिद्धी विरोधात संघर्षासाठी तयार करत असल्याचे महाराजांनी तेव्हा जाहिर केले होते. मात्र, मराठ्यांचे आरमार तयार झाले तर पोर्तुगीजांनाही धोका निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर पोर्तुगीज अधिकारी पळून गेले. कालांतराने मराठ्यांच्या आरमाराची जबाबदारी कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पालदी-मुसलमान यांच्यावर आली.

हेही पहा – 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपण हे गुण अंगिकारले पाहिजे

१. व्यवस्थापन

स्वराज्यासाठी मावळ्यांचे संघटन, कमी सैन्यदलासाठी आखलेली स्वतंत्र युद्धनीती, कौशल्य ओळखून केलेली सैन्य निवड, शत्रूच्या गोटातील व प्रजेतील माहिती काढण्यासाठी केलेली हेरगिरी, दुर्गम डोंगर-कड्यांवरील गड, किल्ले यांची निर्मिती, भविष्यात शत्रू समुद्रमार्गे येणार याची दूरदृष्टी असल्याने केलेली दुर्गनिर्मिती, लढाया जिंकण्यासोबतच परिस्थिती विरोधात असताना केलेले तह अशा अनेक पैलूंमुळे छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आदर्श व्यवस्थापन गुरू ठरतात.

२. भौगोलिक स्थितीचा अभ्यास

युद्धाला जाण्यापूर्वी तिथला मुलुख, त्याची नैसर्गिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान याचा अचूक अभ्यास करून महाराज लढाईसाठी सज्ज होत असत.

३. गनिमी कावा व प्रसंगावधान

स्वराज्यातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांच्या, झाडाझुडपांच्या साहाय्याने शत्रूवर गनिमी कावा करणे हे महाराजांचे सर्वांत मोठे शस्त्र होते. तसेच प्रत्येकवेळी केवळ लढाया करवून भागात नाही तर वेळप्रसंगी तह देखील करावा लागतो. आपल्याला ही शिकवण महाराजांनी मिर्जाराजे जयसिंह यांच्यासोबत तह करून दिली.

४. योग्य निवड

मुघल, निझाम, आदिलशाही यांच्या तुलनेने महाराजांकडे मनुष्यबळ कमी असल्याने सैन्य दलात मावळ्यांची त्यांच्या कौशल्याची पारख करून केलेली निवड व वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या यामधून त्यांची योग्य निवड करण्याची ताकद दिसून येते.

५. एकजुट

जात, पंथ, भाषा व प्रदेशाची अस्मिता दूर करून १८ पगड जातीमधील प्रजेला एक करून त्यांच्या मनात केवळ आणि केवळ स्वराज्याची भावना चेतवण्याचे काम महाराजांनी अगदी सहजरित्या केले.

६. दूरदृष्टी

पोर्तुगीज व इंग्रज समुद्रमार्गे येत असल्याचे दिसून येताच समुद्र आरमार व दुर्गउभारणी हे त्यांच्या दूरदृष्टीचे पुरावे आहेत.

७. नेतृत्व कौशल्य

केवळ आदेश न देता स्वतः सर्वांच्या पुढे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता, योग्य निर्णय, लढवय्येपणा, अचूक व्यवस्थापन कौशल्य या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाने आत्मसात करण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नसून ते महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराजांनी त्यांच्या कार्यातून आदर्श व्यक्ती, आदर्श राजा कसा असावा हे दाखवून दिले. म्हणूनच संत रामदास स्वामी यांनी,
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।

असं छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचं वर्णन केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.