T20 World Cup Snub : रिंकू सिंगच्या गावकऱ्यांनी आणून ठेवले होते फटाके आणि मिठाई 

T20 World Cup Snub : मागच्या वर्षभरात रिंकू सिंग शेवटच्या षटकांत तडाखेबाज फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून समोर आला आहे

120
T20 World Cup Snub : रिंकू सिंगच्या गावकऱ्यांनी आणून ठेवले होते फटाके आणि मिठाई 
T20 World Cup Snub : रिंकू सिंगच्या गावकऱ्यांनी आणून ठेवले होते फटाके आणि मिठाई 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup Snub) भारतीय संघ बुधवारी जाहीर झाला तेव्हा दोन नावं संघातून वगळल्याबद्दल चर्चा झाली. यातील एक अर्थातच के एल राहुल (KL Rahul) आणि दुसरा रिंकू सिंग (Rinku Singh). रिंकू सिंगला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी संधी मिळाली नसली तरी मागच्या वर्षभरात संघातील तडाखेबाज फलंदाज आणि संघाला मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये स्थैर्य मिळवून देणारा फलंदाज अशी त्याची ओळख बनली होती. त्यामुळे रिंकू सिंगचं (Rinku Singh) नाव जवळ जवळ निश्चित मानलं जात होतं. पण, ऐनवेळी नाव वगळल्यामुळे रिंकू सिंगही खट्टू झाला आहे. (T20 World Cup Snub)

(हेही वाचा- Jharkhand Congress X Account Withheld : अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई; झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड)

त्याचं गाव अलिगढमध्ये मित्रांनी फटाके आणि मिठाई आणून ठेवली होती. पण, संघ जाहीर झाल्यावर त्यांचाही हिरमोड झाला. रिंकूचे वडील याविषयी मीडियाशी बोलले. ‘रिंकूचा त्याच्या आईला फोन आला होता. तो अर्थातच थोडा नाराज होता. आम्हीही मिठाई, फटाके आणून ठेवले होते. पण, जे झालं ते स्वीकारावंच लागेल. त्याला पुढे संधी नक्की मिळेल,’ असं वडील म्हणाले. (T20 World Cup Snub)

रिंकू ऐवजी शिवम दुबे, हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. (T20 World Cup Snub)

रिंकूचा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ मात्र या कठीण समयी त्याच्याबरोबर उभा राहिला आहे. संघाचा मालक शाहरुख खानने रिंकू सिंगला (Rinku Singh) आलिंगन दिलं. अशा वेळी त्याच्या बरोबर राहणं पसंत केलं. दोघांनी कोलकाता ते मुंबईचा प्रवास एकत्र केला. शाहरुखने (Shah Rukh) रिंकूला काही समजुतीच्या गोष्टीही सांगितल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये रिंकूने ९ सामन्यांत ११० धावाच केल्या आहेत. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याला खूप कमी संधी मिळाली.  (T20 World Cup Snub)

(हेही वाचा- Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!)

पण, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (T20 World Cup Snub) मागच्या वर्षभरात त्याने १५ सामन्यांत ३५६ धावा केल्या आहेत. आणि त्याची सरासरी ८९ इतकी आहे. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्यामुळे त्याला कमीच षटकं खेळायला मिळतात. पण, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या कमी संधीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. (T20 World Cup Snub)

रिंकू सिंगचा (Rinku Singh) मुख्य संघात समावेश नसला तरी तो राखीव खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाबरोबर तो वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला जाणार आहे. (T20 World Cup Snub)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.