Best Bus : बेस्टला महापालिकेचा आधार, दिले ८०० कोटी रुपये!

12846
Best Bus : बेस्टला महापालिकेचा आधार, दिले ८०० कोटी रुपये!
Best Bus Fares : बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा, लवकर होणार बस प्रवासात वाढ?
  • सचिन धानजी, मुंबई
तुम्हाला यापुढे एकही पैसा देता येणार नाही, आधी यापूर्वी दिलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशा प्रकारचा पावित्रा घेणाऱ्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी अखेर बेस्ट (Best Bus) प्रशासनापुढे पुढे हात मोकळे केले.  बेस्ट उपक्रमाला चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असून या तरतुदीतूनच ८०० कोटी रुपयांची रक्कम बेस्ट देण्याच्या निर्णय प्रशासकांनी घेतला आहे.  अनुदानाची ही रक्कम आता बेस्ट प्रशासनाला  तात्काळ दिली जाणार आहे.आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीकरीता सानुग्रह अनुदान देणे तसेच दरमहा काही ठराविक रक्कम देण्यासाठी ८०० कोटी रुपयांचे अधिदान करण्यात येणार आहे. (Best Bus)
मागील दोन आठवड्यांपूर्वी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण (Bhushan Gagrani) यांची गगराणी यांची भेट घेऊन बेस्टला आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त( प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) आणि महापालिका लेखा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्ताने बेस्ट अनुदान देण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र  प्रत्यक्षात महापालिका आयुक्त भूषण  गगराणी यांनी बेस्टला चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या रकमेतून ८०० कोटी रुपयांची रक्कम बेस्ट देण्याचा निर्धार पक्का केला आहे. बेस्ट प्रशासनाचा ८०० कोटी रुपयांची देण्याचा निर्णय ही आयुक्ताने घेतला असून प्रशासकाच्या  मंजुरीनुसार या आठशे कोटी रुपयांचे अधिदान बेस्टला करण्याची प्रक्रीया  सूरू केली आहे. (Best Bus)
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला अनुदानाचे अधिदान करण्यात येत असून “बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमास त्यांच प्रचालन व्यवस्था सुधारण्यासाठी सहाय्य म्हणून सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये रु.८०० कोटी इतकी तरतुद करण्यात आली आहे. (Best Bus)
बेस्ट उपक्रमाला यासाठी दिले अनुदान
– पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी करण्यासाठी,
-कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी,
-भाडेतत्वावरील (Wet Lease) नवीन बसेस घेण्यासाठी,
– वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी,
-आयटीएमएस प्रकल्प..
-बेस्ट उपक्रमामार्फत मे. टाटा पॉवर कंपनी लि. यांना देय असलेली विद्युत देणी अदा करण्यासाठी…
-बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीकरीता सानुग्रह अनुदान देण्यासाठी….
-बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रोत्साहन भत्याचे अधिदान करण्यासाठी…
– बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाच्या रकमेचे अधिदान करण्यासाठी….
– बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागविण्यासाठी….
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.