एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावे – विनोद तावडे

204
एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावे - विनोद तावडे
एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावे - विनोद तावडे

राजकीय नेते नेहमी असे काही विधान करताना ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजते. आता भाजपचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विधान केले आहे. एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले आणि यामुळे आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नक्की काय म्हणाले विनोद तावडे?

एका वृत्तसंस्थेशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राची एकनाथ खडसेंना चांगली जाण आहे. त्यांच्या सारखा नेता भाजपमध्ये असावा, असे माझे मत आहे.

(हेही वाचा – Supriya Sule : ‘शाहरुख’च्या मुलाचे समर्थन करणाऱ्या सुप्रिया सुळे घोरपडीतील पीडितेला भेटायला कधी जाणार? नितेश राणे यांचा सवाल)

दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत उडालेले खटके आणि संघर्ष यामुळे एकनाथ खडसे नाराज झाले आणि त्यांनी भाजपला रामराम केला. भाजपमध्ये असतानाही आणि भाजप सोडल्यानंतरही खडसे यांनी फडणवीसांवर उघडपणे टीका केली.

सध्या पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांची चौकशी प्रलंबित आहे. तसेच खडसे यांचे जावई गेले दोन वर्ष तुरुंगावासात आहेत. असे असतानाही एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, असे मत विनोद तावडे यांनी व्यक्त केल्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.