BMC: येत्या १० दिवसांत समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जुलैपासून २० टक्के पाणीकपात, पालिकेचे संकेत

85
BMC: येत्या १० दिवसांत समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जुलैपासून २० टक्के पाणीकपात, पालिकेचे संकेत
BMC: येत्या १० दिवसांत समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जुलैपासून २० टक्के पाणीकपात, पालिकेचे संकेत

BMC:  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये पाणीसाठा घसरून सुमारे ९ ते १० टक्क्यांवर आला आहे. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आधीच शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली असून, स्विमिंग पूल आणि बांधकाम प्रकल्पांचा पाणीपुरवठा बंद केला आहे, यंदा मोसमी पाऊस खूपच लांबल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये ९.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून २० ते २५ टक्के पाणीकपात लागू करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.

सध्याचा साठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ९ ते १० टक्क्यांच्या दरम्यान (जवळपास १.४ लाख दशलक्ष लिटर) शिल्लक आहे.

हेही वाचा – Monsoon लांबला! पेरणीबाबत शेतकऱ्यांना जय पवारांचा महत्त्वाचा सल्ला

राखीव साठ्याचा वापर

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्याचा वापर करण्याची परवानगी पालिकेला दिली आहे.

पालिका प्रशासनाने उचललेली पावले
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे पाणी जपून वापरण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत.
  • बांधकाम क्षेत्राला बंदी: नवीन बांधकामांना दिले जाणारे पाणी कनेक्शन पूर्णपणे थांबवण्यात आले आहेत आणि चालू प्रकल्पांचे पाणी कनेक्शनही तोडण्यात आले आहेत.
  • व्यावसायिक कपात: औद्योगिक आस्थापना, व्यावसायिक दुकाने आणि स्पोर्ट्स क्लबसाठी पाणीपुरवठ्यात २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. 
  • पिण्याच्या पाण्याला प्राधान्य: पिण्याचे पाणी सोडले तर गाड्या धुणे, बागेला पाणी घालणे अशा इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
  • …अजून राखीव साठ्याला हात नाही
    भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून राखीव साठा उचलण्यास राज्य सरकारने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे, मात्र अद्याप तरी पालिकेने राखीव साठ्याला हात लावलेला नाही. सध्या धरणांमध्ये ९.६७ टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा सात किंवा साडेसात टक्क्यांवर आल्यास मात्र राखीव साठ्यातून पाणी घ्यावे लागणार आहे. धरणांमधील पाण्याची पातळी जोपर्यंत राखणे शक्य होते, तोपर्यंत आहे तो पाणीसाठा वापरता येतो, मात्र पातळी राखणे शक्य न झाल्यास राखीव साठा घ्यावा लागतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.