Sharad Pawar NCP Meeting : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची २८ सप्टेंबरला बैठक; दुष्काळासह एसआयआरवर चर्चेची शक्यता

9
Sharad Pawar NCP Meeting
Sharad Pawar NCP Meeting
  • प्रतिनिधी

Sharad Pawar NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने येत्या २८ सप्टेंबरला मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थिती, संकट, एसआयआर, स्पर्धा परीक्षेची पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन आदी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे येथे सकाळी १० वाजता ही बैठक होईल. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसह पक्षाच्या विविध फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष तसेच विविध सेलचे राज्यप्रमुख बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आगामी काळातील पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कामकाजाबाबत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Gujratमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा, परिसरात खळबळ )

राज्यातील सध्याची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, तसेच आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या या राज्यस्तरीय बैठकीत दुष्काळाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

दुष्काळी भागाला भेट देणार

दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार असल्याचे समजते. पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर शरद पवार यांनी आता दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.