‘खासदार फुटले’ या बातमीवर Raj Thackeray यांचा संताप; भ्रष्ट राजकारणावर थेट प्रहार!

'खासदार फुटले' या बातमीवर Raj Thackeray यांचा संताप; भ्रष्ट राजकारणावर थेट प्रहार!

104
Raj Thackeray
Raj Thackeray
प्रतिनिधी

​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्याच्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजकीय भूकंपाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या संपूर्ण गदारोळात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासावर बोट ठेवले आहे.

​राज्यात एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे राजकीय नेते केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या खेळात मग्न आहेत, यावर राज ठाकरेंनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “आज देशाचा आणि राज्याचा विचका झाला असून, आपण आपल्याच राज्याचे किती नुकसान करत आहोत, याचे भान कोणालाच उरलेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.(Raj Thackeray)

(हेही वाचा – NEET UG Re-Exam 2026 : नीट पुनर्परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका वायुसेनेद्वारे १४ केंद्रांवर सीआरपीएफचा बंदोबस्त )

​पैशांच्या बळावर लोकप्रतिनिधींना विकत घेण्याच्या प्रवृत्तीवर हल्ला चढवताना राज ठाकरे म्हणाले की, “वाट्टेल तितका पैसा देऊन माणसे विकत घेतली जात आहेत. ज्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी सर्वसामान्य जनता उन्हातान्हात तासन् तास रांगेत उभी राहते, तोच लोकप्रतिनिधी जर केवळ ५० ते १०० कोटींसाठी विकला जात असेल, तर हे संतापजनक आहे.”(Raj Thackeray)

​निवडणुकीत मतदान करणाऱ्या जनतेलाही त्यांनी आरसा दाखवला आहे. “जे लोक विकले गेले आहेत, त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का? पुढच्या वेळी ते समोर आले तर तुम्ही त्यांना निवडून देणार का? आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या प्रकारचे राजकारण दाखवत आहोत?” असे गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केले.(Raj Thackeray)

​राजकारणात सुरू असलेल्या या ‘खरेदी-विक्रीच्या’ खेळाने लोकशाहीच्या मूल्यांचा बळी जात असल्याचे सांगत, आता जनतेनेच अशा नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यांच्या या परखड विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.(Raj Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.