नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत १०० इलेक्ट्रिक बस (Electric Bus) मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन (Charging station) बुधवार पेठेत उभारण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
महापालिकेला मिळणाऱ्या या १०० बसपैकी १० बस महिलांसाठी विशेष राखीव असणार आहेत. ‘पिंक बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बस महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
(हेही वाचा – Iran चा आखाती देशांना पुन्हा गंभीर इशारा; जर सुरक्षित राहायचे असेल तर…)
बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनमध्ये एकाच वेळी २० बस चार्ज करता येणार असून, बस उभ्या करण्यासाठी स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक बैठक व्यवस्थेच्या खोल्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे.
दरम्यान, या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३० इलेक्ट्रिक बस (Electric Bus) मे महिन्यात महापालिकेला प्राप्त होणार असून, त्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

