Iran चा आखाती देशांना पुन्हा गंभीर इशारा; जर सुरक्षित राहायचे असेल तर…

इराण (Iran) पूर्वनियोजित हल्ले कधीही करत नाही. जर आमच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केले गेले तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे इराणने म्हटले आहे.

147
Explosion in a cityscape with a speaker addressing an audience.
Iran's president issues a serious warning to Gulf states.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील (Iran) युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला. जवळपास चार आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे. आता हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला होता. पण अमेरिकेने दिलेला प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे.

युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटींवर चर्चा सुरू आहेत. मात्र, यातच इराणने आखाती राष्ट्रांना पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आखाती राष्ट्रांबाबत एक महत्वाचे भाष्य केले आहे. जर तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल तर आमच्या शत्रूंना तुमच्या भूमीवरून युद्ध चालवू देऊ नका, असे मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा CM Adityanath Yogi यांना खेळण्यातील बुलडोझर भेट देणाऱ्या ५ वर्षांच्या चिमुकलीने जिहादी मुसलमानांना केले अस्वस्थ)

मसूद पेझेश्कियान काय म्हणाले?

आम्ही वारंवार सांगितले आहे की, इराण (Iran) पूर्वनियोजित हल्ले कधीही करत नाही. जर आमच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केले गेले तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. तसेच या प्रदेशातील देशांनो, जर तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल तर आमच्या शत्रूंना तुमच्या भूमीवरून युद्ध करू देऊ नका, असा इशारा इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचाही इराणला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत  (Iran) सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत कडक भूमिका मांडली. इराणी प्रतिनिधींच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत टीका केली. इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अत्यंत वेगळे आणि विचित्र असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले होते. ट्रम्प म्हणाले, वाटाघाटी करणारे इराणचे अधिकारी वेगळे आणि विचित्र आहेत. लष्करीदृष्ट्या इराणचे  (Iran) मोठे नुकसान झाले असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता सध्या शून्य आहे. अशा परिस्थितीत इराण करारासाठी अमेरिकेकडे विनवणी करत असून जी त्यांनी करायलाच हवी, मात्र सार्वजनिकरित्या ते केवळ अमेरिकेच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे भासवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. इराणने  (Iran) लवकरात लवकर या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर वेळ निघून गेली, तर पुन्हा मागे फिरता येणार नाही आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती कोणासाठीही सुखद नसेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.