Tukaram Mundhe : दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी! आता १-२ नव्हे, तर २१ प्रवर्गांना मिळणार सर्व सरकारी योजनांचा लाभ

Tukaram Mundhe : दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी! आता १-२ नव्हे, तर २१ प्रवर्गांना मिळणार सर्व सरकारी योजनांचा लाभ

125
दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेला
Disabled Students Scholarship : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
प्रतिनिधी,मुंबई

महाराष्ट्रातील दिव्यांग सक्षमीकरणाच्या प्रवासात एक ऐतिहासिक वळण आले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ ची कडक अंमलबजावणी करत, आता राज्यातील सर्व २१ प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि अनुदानांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे(Tukaram Mundhe)यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – IPL 2026 : जाणून घ्या या हंगामातील गुजरात टायटन्स संघाचं संपूर्ण वेळापत्रक  )

​आता या २१ प्रवर्गांचा झाला समावेश:
  • ​शारीरिक: अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पीडित.
  • ​दृष्टी व श्रवण: पूर्णतः अंधत्व, अंशतः अंध, कर्णबधिरता, वाचा व भाषा दोष.
  • ​बौद्धिक व मानसिक: बौद्धिक अक्षमता, विशिष्ट अध्ययन अक्षमता, स्वमग्नता (Autism), मानसिक आजार.
  • ​रक्त व मज्जासंस्था: मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल, मज्जासंस्थेचे तीव्र आजार आणि बहुविकलांग.
​काय आहेत लाभाच्या अटी?
  • ​UDID कार्ड अनिवार्य: सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले किमान ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे ‘वैश्विक दिव्यांग ओळखपत्र’ (UDID) असणे आवश्यक आहे.
  • ​कायमस्वरूपी प्रमाणपत्र: हा लाभ केवळ कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाच मिळेल; तात्पुरत्या प्रमाणपत्रधारकांना हा लाभ घेता येणार नाही.
​मिळणारे प्रमुख लाभ:
  • ​घरकुल आणि गृहनिर्माण योजना.
  • शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती.
  • ​स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल आणि आर्थिक सहाय्य.
  • ​दिव्यांग विवाह योजना आणि साधने/उपकरणांसाठी मदत.

​हा निर्णय सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि शासकीय निमशासकीय संस्थांना बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी मदत होणार आहे.(Tukaram Mundhe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.