West Bengal : अखेर ममता बॅनर्जींनाही आठवला प्रभु श्रीराम; प्रथमच दिली रामनवमीची सुट्टी

West Bengal : ममता यांनी आता सुट्टी दिली असली, तरी गेल्या वर्षी रामनवमीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे.

164
West Bengal : अखेर ममता बॅनर्जींनाही आठवला प्रभु श्रीराम; प्रथमच दिली रामनवमीची सुट्टी
West Bengal : अखेर ममता बॅनर्जींनाही आठवला प्रभु श्रीराम; प्रथमच दिली रामनवमीची सुट्टी

देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) तयारी चालू आहे. भाजपने अनेक विकासकामांसह राममंदिराच्या मुद्द्याचाही जोरदार प्रचार चालू केला आहे. त्याचा परिणाम बंगालमध्येही दिसून आला आहे. एरव्ही ‘जय श्रीराम’च्या घोषणेनेही अस्वस्थ होणाऱ्या ममता सरकारने यंदा रामनवमीलाही शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. (West Bengal)

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा, काली पूजा आणि सरस्वती पूजेला जास्त महत्त्व आहे. काही वर्षांपासून तेथे रामनवमी आणि हनुमान जयंतीही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. यावर्षी १७ एप्रिलला रामनवमी आहे. त्या दिवशी बंगाल सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

(हेही वाचा – Holi Special Train : मध्य रेल्वेकडून 112 होळी स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक)

लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. प्रत्येक पक्षाने आपापल्या परिने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने विविध महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपने केलेला आरोप

ममता यांनी आता सुट्टी दिली असली, तरी गेल्या वर्षी रामनवमीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. बंगाल सरकार रामनवमीच्या दिवशी लोकांच्या एकत्र येण्याच्या आणि धार्मिक मिरवणुका काढण्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप करत आले आहे.

भाजप (BJP) सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यांची हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, आता खूप उशीर झाला आहे. मात्र, रामनवमी यात्रेदरम्यान दगडफेक होऊ नये, याची काळजी घेतली जाईल का, असा प्रश्न भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उपस्थित केला आहे. (West Bengal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.