Holi Special Train : मध्य रेल्वेकडून 112 होळी स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक

1297
Holi Special Train : मध्य रेल्वेकडून 112 होळी स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक
Holi Special Train : मध्य रेल्वेकडून 112 होळी स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक

कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई आणि देशाच्या इतर भागात स्थायिक झालेले कोकणवासीय या निमित्ताने गावी जातात. त्यांची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेकडून (Central railway) होळी विशेष 112 ट्रेन (Holi Special Train) चालवण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते गोव्यातील थिवि रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष 6 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष ट्रेन, पनवेल – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष ट्रेन,पनवेल – थिवि साप्ताहिक विशेष ट्रेन देखील चालवल्या जाणार आहेत. यंदा होळी 24 मार्च आणि धुलिवंदन 25 मार्च रोजी आले आहे.

(हेही वाचा – Glenn Phillips Superman Catch : पाहूया न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचा सुपरमॅन झेल)

याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – बनारस साप्ताहिक विशेष ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन,लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष ट्रेन चालवल्या जातील. शनिवार-रविवार जोडून धुलिवंदनाची सुट्टी आल्याने प्रवाश्यांसाठी ही मध्य रेल्वेकडून विशेष सेवा पुरवली जाणार आहे.

विशेष गाड्यांसाठी बुकींग सुरु

या सर्व विशेष गाड्यांसाठीचे बुकींग 8 मार्चपासून सुरु झाले आहे. www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन हे बुकींग करता येणार आहे. तसेच प्रवाशी युटीएस प्रणालीद्वारे देखील तिकीटे बुक करु शकतील. या संपूर्ण गाड्यांचा तपशील www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असेल गाड्यांचे वेळापत्रक

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – थिवि साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या)

01187 विशेष दि. १४.०३.२०२४, दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल
01188 विशेष दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी थिवि येथून १६.३५ वाजता सुटेल

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

पुणे – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या)

01441 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि.१९.०३.२०२४ आणि दि. २६.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०९.३५ वाजता सुटेल
01442 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल

थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

पनवेल – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या)

01443 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पनवेल येथून ०९.४० वाजता सुटेल
01444 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४ आणि दि.२६.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल

थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – थिवि साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)

01107 विशेष दि. १५.०३.२०२४, दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल
01108 विशेष दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

पनवेल – थिवि साप्ताहिक विशेष (६ फेर्‍या)

01109 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २३.५५ वाजता सुटेल
01110 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

पुणे – थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)

01445 विशेष दि. ०८.०३.२०२४, दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01446 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (४ फेर्‍या)

थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

पनवेल – थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)

01447 विशेष दि. ०९.०३.२०२४, दि.१६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ ते दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल
01448 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि.३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल

थांबे: पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – बनारस साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)

01053 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल
01054 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेऱ्या)

01409 विशेष दि.२३.०३.२०२४, दि. २५.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल
01410 विशेष दि. २४.०३.२०२४, दि.२६.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 फेऱ्या)

01043 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल
01044 विशेष दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष (८ फेऱ्या)

01045 विशेष दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४, दि. २६.०३.२०२४ आणि दि. ०२.०४.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल
01046 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४, दि. २७.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजी प्रयागराज येथून १८.५० वाजता सुटेल

पुणे – कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४ फेऱ्या)

01037 विशेष दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३५ वाजता सुटेल
01038 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी कानपूर सेंट्रल येथून ०८.५० वाजता सुटेल

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेऱ्या)

01123 विशेष दि. १५.०३.२०१४, दि. २२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल
01124 विशेष दि. १६.०३.२०२४, २३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल. (Holi Special Train)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.