Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला 

जिल्ह्यातील फकीरवाड्यातील उरुसामध्ये ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली.

159

एमआयएमचे औरंगजेबाचे प्रेम वारंवार उफाळून आलेले आहे. आता अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) मध्ये एमआयएमच्या शहराध्यक्षाने उरुसाच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो झळकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण? 

जिल्ह्यातील फकीरवाड्यातील उरुसामध्ये ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जहागीरदार हे औरंगजेबाचा फोटो घेऊन उरुसामध्ये नाचले होते. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र आणि देशात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्या माफी नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. आता पोलीस या व्हिडिओची चौकशी करत आहेत. असे करण्यामागे शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

(हेही वाचा https://www.marathi.hindusthanpost.com/politics/aurangzeb-photo-appear-in-aimim-mp-imtiaz-jaleel-protest-over-aurangabad-renaming/)

या आधी एमआयएमला कधी आलेला औरंगजेबाचा उमाळा? 

  • याआधी छत्रपती संभाजी नगर येथे एमआयएमच्या सभेत औरंग्याच्या फोटो झळकला होता.
  • एमआयएमचे नेते अकरुद्दीन ओवैसी जेव्हा छत्रपती संभाजी नगर येथे आले होते, तेव्हा त्यांनी औरंग्याच्या थडग्याचे दर्शन घेतले होते.
  • औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एक आठवड्याने एमआयएम पक्षाने नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आंदोलनात दुपारच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.