अवधेश राय हत्या प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेप

118
अवधेश राय हत्या प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेप
अवधेश राय हत्या प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेप

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी-एमएलए न्यायालयाने अवधेश राय यांच्या खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरोपी मुख्तार अन्सारी हा माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारींचा पुतण्या आहे.

(हेही वाचा – खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना लागली २० वर्षे; नेमके प्रकरण काय?)

काँग्रेस नेते आणि माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय यांची ३ ऑगस्ट १९९१ रोजी वाराणसीतील अजय राय यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सोमवारी न्यायालयाने मुख्तार अन्सारी याला अवधेश राय खून प्रकरणात दोषी ठरवले आहे. काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वाराणसीच्या चेतगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलीस स्थानकात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. दरम्यान या ५ आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.