बालासोर रेल्वे अपघाताच्या ३ दिवसांनंतर पुन्हा ओडिशात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून घसरले

187
बालासोर रेल्वे अपघाताच्या ३ दिवसांनंतर पुन्हा ओडिशात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून घसरले
बालासोर रेल्वे अपघाताच्या ३ दिवसांनंतर पुन्हा ओडिशात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून घसरले

तीन दिवसांपूर्वीच ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला, ज्यात २७५ जणांचा मृत्यू झाला असून ११००हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघात ताजा असतानाच ओडिशात पुन्हा एकदा सोमवारी, ५ मे रोजी रेल्वे अपघात झाला आहे. ओडिशातील बरगढमध्ये मालगाडीचे ५ डबे रुळावरून घसरले आहेत. मात्र, या अपघातात कोणातीही हानी झालेली नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

(हेही वाचा – Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार – रेल्वे मंत्री)

या अपघातानंतर रेल्वेकडून आलेल्या वक्तव्यात नमूद केल्यानुसार ही मालगाडी खासगी सिमेंट कंपनी नॅरोगेज साइडिंगवर चालवत होती. रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅक (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल कंपनी स्वतः करत आहे. ही मालगाडी चुनखडीने भरलेली होती आणि बारगढ येथे तिचे ५ डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय. सुदैवाने या कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

यापूर्वी २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ११०० जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी १८७ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. बालासोरच्या बहनगा बाजार स्टेशनजवळ चेन्नईहून हावडाकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यानंतर कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले. हे डबे जवळून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसला धडकले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.